Saturday, March 2, 2024

कंगणा रणौतकडे पाहून जया बच्चनने फिरवली पाठ! सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल

बॉलिवूडची सुप्रसिद्ध आणि पंगा क्वीन कंगणा रणौत(Kangana Ranaut) तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. मुंबईत ‘उंचाई’ स्पेशल स्क्रीनिंगचे आयोजन करण्यात आले होते. या स्पेशल स्क्रीनिंगसाठी अनेक बाॅलिवूड स्टारर्सने हजेरी लावली. अनुपम खेर सर्व पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी पुढे होते. बॉलीवूड अभिनेते अमिताभ बच्चन, बोमन इराणी, डॅनी डेन्झोंगपा, परिणीती चोप्रा आणि नीना गुप्ता यांच्या ‘उछाई’ चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग करण्यात आले होते. ज्यामध्ये अनेक दिग्गज सेलेब्स देखील सहभागी झाले होते.

विशेष म्हणजे कंगना रणौत, अक्षय कुमार, सलमान खान, अभिषेक बच्चन, भाग्यश्री यांच्यासह सर्व सेलिब्रिटींनी ‘उच्छाई’ चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगला हजेरी लावली होती. या स्पेशल स्क्रीनिंगसाठी पत्नी जया बच्चन देखील पोहचल्या होत्या. जया बच्चन स्टेजवर गेल्यानंतर असे काही घडले की, त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. नेहमीप्रमाणे यामुळे जया बच्चन चर्चेचा विषय ठरल्या आहेत.

जया बच्चन करतात दुर्लक्ष
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर चाहते चांगलेच संतापले आहेत. वास्तविक, उंचाईच्या स्पेशल स्क्रिनिंगवेळी जया बच्चन स्टेजवर येतात. त्यावेळी अनुपम खेरसोबत अनेक कलाकार स्टेजवर होते. या व्हिडिओमध्ये जया बच्चन कंगना राणौतकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. कंगना रणौतने जया बच्चनला शुभेच्छा दिल्यावर ती कोणतीही प्रतिक्रिया न देता पुढे निघून जाते. व्हिडिओमध्ये अनुपम खेर जया बच्चनला कंगनाला भेटायला सांगतात पण तिने पाठ फिरवली. त्यानंतर चाहत्यांच्या नजरा त्यावर खिळल्या होत्या. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहत्यांनी आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली.

 

View this post on Instagram

 

अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या
कंगना आणि जया बच्चनचा हा व्हिडीओ पाहून युजर्स प्रतिक्रिया देत आहेत. एका चाहत्याने म्हटले की, कंगनाला कोणाचीही गरज नाही, तर दुसऱ्या चाहत्याने सांगितले की, जया बच्चन कंगनाला घाबरत आहेत. अशा अनेक कमेंट्स ‘उंचाई’च्या स्पेशल स्क्रिनिंगच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळाल्या. जया बच्चन एक असभ्य महिला असल्याचे चाहत्यांचे म्हणणे आहे. एका युजरने म्हटले,’कंगना रणौत असा विचार करत असेल की जया बच्चनही इथे आल्या आहेत’ तर दुसर्‍याने लिहिले, ‘जया कंगनाला घाबरते.’ अशातच अनेक चाहत्यांनी मस्ती केली तर काहींनी संताप व्यक्त केला.(jaya bachchan ignores kangana ranaut fans reaction to the viral video)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मलायकाने अर्जुनला लग्नासाठी दिला होकार! अभिनेत्रीने केलेल्या पोस्टवर ‘या’ स्टार्सने दिल्या शुभेच्छा
रिया कपूनने ‘द क्रू’ चित्रपटाची केली घोषणा; करिना,तब्बू अन् क्रिती साकारणार प्रमुख भूमिका

हे देखील वाचा