Saturday, June 29, 2024

चित्रपटांपासून दूर असलेल्या श्वेताने सांगितला बालपणीचा ‘ताे’ किस्सा; म्हणाली, ‘मेकअप रूममध्ये…’

श्वेता बच्चन बॉलिवूडच्या दिग्गज घराण्यातील असूनही तिने चित्रपटात काम केले नाही. वडील अमिताभ बच्चन, आई जया बच्चन आणि भाऊ अभिषेक बच्चन यांच्या विपरीत ती लाइमलाइटपासून दूर राहणे पसंत करते. तिने अभिनयात करिअर केले नाही, तर त्यामागे काही कारणे आहेत. याचा खुलासा खुद्द स्टारकिडने एका मुलाखतीत केला आहे. काय म्हणाली श्वेता बच्चन? चला जाणून घेऊया…

माध्यमातली वृत्तांनुसार, श्वेता बच्चनची फिल्मी दुनियेत काम करण्याची इच्छा बालपणात एका अपघातानंतर संपली, ज्याचा खुलासा तिने ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये केला होता. स्टारकिडने सांगितले होते की, “मी लहानपणी आई-वडिलांसोबत शूटिंगला जायची. मात्र, एके दिवशी मी माझ्या वडिलांच्या मेकअप रूममध्ये खेळत असताना माझे बोट उघड्या सॉकेटमध्ये अडकले. यानंतर मी कधीच सेटवर गेले नाही.” ही घटना ती फिल्मी दुनियेपासून वेगळे होण्याचे प्रमुख कारण ठरले.

 

View this post on Instagram

 

A post shared by S (@shwetabachchan)

श्वेता बच्चनला कधीच गर्दीची ठिकाणे आवडत नाहीत. चित्रपटांच्या सेटवर असेच वातावरण असते. त्यामुळे तिला  प्रसिद्धीच्या झोतात राहणे देखील आवडत नाही, हे तिचे चित्रपटांपासून दूर राहण्याचे दुसरे प्रमुख कारण आहे. बॉलीवूड इव्हेंट्स आणि फंक्शन्समध्ये ती दिसली तरीही तिने एक लेखिका म्हणून आपला ठसा उमटवला आहे. काही काळापूर्वीच श्वेता एका कार्यक्रमादरम्यान रॅम्प वॉक करताना दिसली हाेती.

 

View this post on Instagram

 

A post shared by S (@shwetabachchan)

49 वर्षीय श्वेताच्या पतीचे नाव निखिल नंदा आहे, ज्यांच्यासोबत तिला नव्या नवेली नंदा आणि अगस्त्य नंदा नावाची दोन मुले आहेत. अगस्त्य नंदा ‘द आर्चिज’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. मात्र, मंडळी तुम्हाला माहित आहे का? निखिल नंदा यांची आई रितू नंदा राज कपूर यांची मुलगी आहे.(bollywood actor amitabh bachchan daughter shweta after childhood accident stopped going to film sets otherwise will be actress like mother jaya )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
ऑस्कर सोहळ्यामध्ये ‘नाटू नाटू’ गाण्यावर रामचरणला करायचा होता डान्स, मात्र ‘या’ कारणामुळे इच्छा राहिली अपूर्ण
कातिलाना अंदाज! माेनालिसाने शाहरुखच्या गाण्यावर लावले ठुमके, बोल्ड व्हिडिओ करेल घायाळ

हे देखील वाचा