Tuesday, March 5, 2024

अबब! अमिताभ बच्चन ब्लॉगमध्ये म्हणाले, ‘मी राकेश कुमारच्या अंत्ययात्रेला जाणार नाही’

मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी त्यांचे खास मित्र आणि चित्रपट दिग्दर्शक राकेश कुमार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. एक भावनिक ब्लॉग लिहून बिग बींनी राकेश कुमार यांची आठवण काढली आहे. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये राकेश कुमार यांच्या अंत्यसंस्काराला हजेरी लावली नसल्याचे सांगितले असून त्यामागचे कारणही त्यांनी उघड केले आहे.

अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी भावूक होऊन त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहिले, “आणखी एक दुःखद दिवस. आणखी एक जोडीदार आम्हाला सोडून गेला, विशेषतः मला. राकेश ‘जंजीर’मध्ये प्रकाश मेहरा यांचे पहिले सहाय्यक दिग्दर्शक, नंतर  यांच्या दुसऱ्या चित्रपटासाठी स्वतंत्र दिग्दर्शक म्हणुन काम केले. त्यांनी ‘हेरा फेरी’, ‘खून पसीना’, ‘मि. नटवरलाल’सारखे चित्रपट बनवले. सेटवर, सामाजिक कार्यक्रमात आणि होळीला मोठ्या सौहार्दाने हजेरी लावात असे.”

अमिताभ बच्चन यांनी ब्लॉगमध्ये पुढे लिहिले की, “एकामागून एक सगळे गेले पण राकेश कुमार सारखे काही लोक आपली छाप सोडतात, जी मिटवणे किंवा विसरणे कठीण असते. पटकथा आणि दिग्दर्शनाची त्यांची समज, त्यांचे लेखन आणि त्यांचे एग्जीक्यूशन, ‘नट्टू’ आणि ‘याराना’ या चित्रपटाच्या दरम्यान त्यांची मस्ती. त्यांना आपल्या क्षमतेवर पूर्ण विश्वास होता आणि त्यांनी ऑड डेला शूटिंगमधून विश्रांती घेण्याचे स्वातंत्र्य दिले जेणेकरून आम्ही आराम करू शकू. आजूबाजूला फिरू शकू आणि त्यांच्यासोबत आनंदाने राहू शकू.”

अमिताभ बच्चन त्यांच्या ब्लॉगमध्ये पुढे लिहितात, “एक अतिशय मनमिळाऊ आणि आनंदी व्यक्ती, जे कोणत्याही प्रकारच्या अडचणीत त्यांच्यासोबत काम करणाऱ्या कलाकारांना मदत करण्यासाठी नेहमी तत्पर असे.” ब्लॉगमध्ये बिग बींनी राकेश यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित न राहण्याचे कारण सांगितले आणि लिहिले की, “नाही, मी त्यांच्या अंत्यविधीला जाण्यास संकोच करेन, कारण मी राकेश यांना असे पाहू शकणार नाही. तुम्ही तुमच्या कथा आणि चित्रपटाने आमच्यासारख्या अनेकांना खास बनवले आहेस. राकेश तुमची खूप आठवण येईल.”

10 नोव्हेंबरला मुंबईत दिग्दर्शक राकेश कुमार यांचे निधन झाले. 81 वर्षीय राकेश कुमार दीर्घकाळापासून कर्करोगाने त्रस्त होते. मुंबईत रविवार, 13 नोव्हेंबरला राकेश यांच्यासाठी प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली आहे. (bollywood actor amitabh bachchan emotionally reminds film director rakesh kumar said he will hesitate to go to his funeral)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
आलिया अन् रणबीरच्या राजकुमारीला भेटणे सोप्पं नाही, जोडप्याने भेटीला येणाऱ्या पाहुण्यांसाठी ठेवली ‘ही’ अट

आलिया-रणवीरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ची रिलीज डेट जाहीर; ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

हे देखील वाचा