Monday, February 26, 2024

आलिया-रणवीरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ची रिलीज डेट जाहीर; ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

अभिनेत्री आलिया भट्टचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. करण जोहर(Karan Johar) दिग्दर्शित या चित्रपटात आलिया भट्ट(Alia Bhatt) आणि रणवीर सिंग(Ranveer Singh) पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. चाहते या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता निर्मात्यांनी या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे. पुढीलवर्षी एप्रिल महिन्यात हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांच्याशिवाय या चित्रपटामध्ये ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र, शबाना आझमी आणि जया बच्चन हे दिग्गज कलाकार देखील दिसणार आहेत. ‘स्टुडंट ऑफ द इयर’ने सुरुवात केलेली आलिया भट्ट सध्या तिच्या करिअरच्या शिखरावर आहे. अलीकडेच तिचा ब्रह्मास्त्र या चित्रपटने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता.

करणने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक खास पोस्ट शेअर करत ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा केली आहे. धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती करण्यात येणार आहे. रॉकी आणि राणीच्या प्रेमावर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. त्यामुळे या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना एक रोमॅंटिक लव्हस्टोरी पाहायला मिळणार आहे.

 

View this post on Instagram

 

करण जोहरने एक खास पोस्ट शेअर करत लिहिलं आहे, 7 वर्षांनंतर पुनरागमन करतो आहे. माझ्या सिनेसृष्टीतील प्रवासात मला एकापेक्षा एक चांगल्या कलाकारांसोबत काम करता आलं आहे. ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटावर कथानक वर्षानुवर्ष चालत आलेल्या रुढी-परंपरांच्या मुळाशी जाणारं आहे. या चित्रपटाचं संगीतदेखील उत्तम आहे. या सिनेमाचं संगीतदेखील उत्तम आहे. प्रतीक्षा संपली आहे… रॉकी आणि राणीची लव्हस्टोरी पुढच्या वर्षी 28 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे”. हा चित्रपट एप्रिल 2023 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. याशिवाय आलिया ‘हार्ट ऑफ स्टोन’ या चित्रपटातून हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

आलिया-रणवीरची भाईजानसोबत टक्कर
बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानचा (Salman Khan) ‘किसी का भाई किसी की जान’ हा सिनेमा पुढील वर्षी ईदच्या मुहूर्तावर म्हणजेच 22 एप्रिल रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. त्यामुळेच बॉक्स ऑफिसवर आलिया-रणवीरची भाईजानसोबत टक्कर होणार आहे.(ranveer singh alia bhatt movie rocky aur rani ki prem kahani to release on 28th april 2023 in cinemas)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘भारत जोडो यात्रे’मध्ये रितेश देशमुख झाला भवूक, पोस्ट शेअर करत व्यक्त केली भावना

अभिनेत्री बिपाशा बासू अन् करण सिंग ग्रोवरच्या लेकीचं ठरले नाव; सोशल मीडियावर नावाची चर्चा

हे देखील वाचा