Monday, March 4, 2024

आलिया अन् रणबीरच्या राजकुमारीला भेटणे सोप्पं नाही, जोडप्याने भेटीला येणाऱ्या पाहुण्यांसाठी ठेवली ‘ही’ अट

अभिनेत्री आलिया भट्ट(Alia Bhatt) आणि रणबीर कपूर(Ranbir Kapoor) यांनी मुलीली जन्म दिला आहे. 6 नोव्हेंबर रोजी आलिया आणि रणबीरने आई-बाबा म्हणून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. बाळाच्या आगमनाने रणबीर आणि आलियाच्या आयुष्यात आनंद द्विगुणित झाला आहे. आलियाच्या मुलीचा फोटो पाहण्यासाठी चाहतेसुद्धा प्रचंड उत्सुक आहेत. अशातच आलिया आणि रणबीरने त्यांच्या मुलीसंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

क्रिकेटपटू विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्यासारखचं रणबीर आणि आलियानेही त्यांच्या बाळाचे फोटो क्लिक करण्याबद्दल अट ठेवली आहे. माध्यमाच्या वृत्तानुसार, बाळाला भेटायला येणाऱ्या कोणत्याच पाहुण्यांना तिचा फोटो काढण्याची परवानगी नाही. रणबीर आलियाने त्यांच्या बाळीसाठी ‘नो-पिक्चर्स पॉलिसी’ अवलंबली आहे. म्हणजेच रणबीर- आलियाच्या परवानगीशिवाय बाळाचा फोटो कोणी काढू शकत नाही. त्यांनी जवळच्या मित्रमैत्रिणींनाही याबद्दलची माहिती दिली आहेत.

बाळाला भेटण्यासाठी कोविड रिपोर्ट आणावा लागेल
आलिया भट्ट आणि रणबीर कपूरची मुलीला भेटणाऱ्यांनाही कोविड-19 टेस्ट निगेटिव्ह प्रमाणपत्र दाखवावे लागेल. कारण लहान मुलांना संसर्ग होण्याचा धोका असतो. बाळाच्या तब्येतीची जाणीव ठेवून रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी हा निर्णय घेतला आहे. आलिया-रणबीरने मीडिया आणि मित्रांना विनंती केली आहे की त्यांची मुलगी एक वर्षाची होईपर्यंत हे नियम पाळावेत.

10 नोव्हेंबर रोजी आलियाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी चिमुकलीला कारमधून घरी घेऊन जातानाचे व्हिडीओ पापाराझींनी शूट करून सोशल मीडियावर पोस्ट केले. मात्र त्यात रणबीरने तिचा चेहरा पूर्णपणे झाकला होता. त्यामुळे आलिया-रणबीरच्या मुलीचा फोटो पाहण्यासाठी चाहत्यांना बरीच प्रतीक्षा करावी लागणार आहे.(ranbir kapoor alia bhatt conditions for anyone who wants to see their baby girl)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
आलिया-रणवीरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ची रिलीज डेट जाहीर; ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

दिव्या अग्रवालचे फाेटाे पाहूण चाहते घायाळ

हे देखील वाचा