Wednesday, June 26, 2024

आमिर खानच्या बोलण्यावर संतापले होते मोगॅंबो, नेमके काय होते कारण? एकदा जाणून घ्याच

मोगैंबो खुश हुआ…हा डायलॉग तर तुम्हाला आठवतच असेलच. हा डायलॉग अभिनेता अमरीश पुरी यांचा आहे. त्यांच्या दमदार आवाजाने चाहतेच काय अभिनेतेसुद्धा घाबरायचे. त्यांनी बऱ्याच हिंदी चित्रपटात खलनायकाची भूमिका केली. अभिनय आणि दमदार आवाजाच्या जोरावर सिनेसृष्टीत त्यांनी राज्य केले. अमरीश पुरी आणि आमीर खान यांचा एक मजेदार किस्सा आहे. अमरीश पुरी यांनी आमीर खान याच्यावर प्रचंड संतापले होते. यावर आमीरने एकही शब्द न बोलता मान खाली घालून शांततेत सर्व ऐकून घेतले. पण या रागाचे नेमके कारण काय होते? ते आपण बघूया…

अमरीश पुरी (amrish puri) आज आपल्यात नसले तरी त्यांनी त्यांच्या अभिनयाने अशी छाप सोडली आहे की, ते चाहत्यांच्या हृदयात अजरामर राहतील. या दिग्गज अभिनेत्याने सलमान खान, शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन यांच्यासह आपल्या कारकिर्दीत जवळपास प्रत्येक मोठ्या स्टारसोबत काम केले. पण त्यांनी आमिर खानसोबत एकही चित्रपट केला नाही. मात्र आमिरच्या एका चित्रपटाच्या सेटवर अमरीश पुरी यांनी त्याला जोरदार फटकारले. आमिरने काहीही न बोलता शांतपणे सर्व ऐकून घेतले. चित्रपटविश्वातून असे किस्से नेहमी ऐकायला मिळतात. तुम्ही हा किस्सा या पूर्वी कधीच ऐकला नसेल असा किस्सा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत चला तर मग…

ही गोष्ट तेव्हाची आहे. जेव्हा आमिर खान एका चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होता. चित्रपटादरम्यान अमरीश हे आमिरवर संतापले. कारण आमिर त्यांना वारंवार काहीतरी समजावत होता. मात्र त्यांना ही गोष्ट अजिबात आवडली नाही. म्हणून ते आमिरवर ओरडले. सेटवर सर्वत्र शांतता पसरली होती. अमरीश हे ज्येष्ठ अभिनेते असल्यामुळे आणि आमिर नवीन असल्याने तो काहीही न बोलता फक्त मान खाली घालून शांतपणे ऐकत राहिला.

हा चित्रपट आमिर खानचे काका नासिर हुसैन दिग्दर्शित करत होते. त्यांनी अमरीश पुरी यांना समजावून सांगितले की, तो फक्त त्याचे काम करत आहेत. मात्र, नंतर जेव्हा अमरीश यांना  समजले की, तो दिग्दर्शकाचा पुतण्या आहे. तेव्हा त्यांनी आमिरची माफी मागितली. एवढच नाही तर त्यांनी त्याच्या कामाचे कौतुकही केले.

सन 1993 मध्ये दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांच्या ‘दामिनी’ चित्रपटातील ‘बिन सावन झुला झुला’ या गाण्यात आमिर खान दिसला होता. या चित्रपटात आमिरने संक्षिप्त म्हणजेच पाहुण्या कलाकाराची (कॅमियो) भूमिका केली होती. या चित्रपटात मीनाक्षी शेषाद्री, ऋषी कपूर आणि सनी देओल मुख्य भूमिकेत होते. अमरीश पुरी यांचीही या चित्रपटात महत्त्वाची भूमिका होती. अमरीश पुरी स्टाररमधील हा एकमेव चित्रपट आहे, ज्यामध्ये आमिर खानने  त्यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली होती. ‘जबर्दस्त’ चित्रपटापूर्वी आमिर खानने ‘मंजिल मंजिल’  चित्रपटामध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम केले होते. पण त्याने लीड म्हणून पहिला चित्रपट ‘कयामत से कयामत तक’ होता. (bollywood actor amrish puri angry on actor aamir khan on set)

अधिक वाचा –
‘मोगॅम्बो खुश हुआ’, म्हणत पडद्यावर क्रूर खलनायक रंगवणारे अमरीश पुरी, सिनेमात येण्यापूर्वी राबले विमा कंपनीत
दु:खद! प्रसिद्ध गायकाने केली आत्म’हत्या, घरात सापडला मृतदेह

हे देखील वाचा