Tuesday, April 23, 2024

दु:खद! प्रसिद्ध गायकाने केली आत्म’हत्या, घरात सापडला मृतदेह

दक्षिण कोरियाचा गायिक चोई सुंग बोंग यांचे वयाच्या 33व्या वर्षी येथे निधन झाले. के-पॉप मूर्ती मंगळवारी सकाळी 9.41 वाजता दक्षिण सोलच्या येओक्सम-डोंग जिल्ह्यातील त्याच्या घरी मृतावस्थेत आढळून आला. अशात त्याने आत्म’हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

चोई सुंग बोंग (choi bong) त्यांच्या तब्येतीमुळे चर्चेत होता. त्याने दावा केला हाेता की, तो कॅन्सरशी झुंज देत आहे. मात्र, नंतर असे उघड झाले की, तो गंभीर आजारी असल्याचे खोटे बाेलला हाेता. माध्यमातील वृत्तानुसार, चोई सुंग बोंगने मृत्यूपूर्वी त्याच्या यूट्यूब चॅनलवर एक मॅसेज पोस्ट केला आहे, ज्यामुळे त्याने आत्म’हत्या केल्याचे दिसून येते. अशात पोलिस त्याच्या मृत्यूचा तपास करत आहेत.

चोई सुंग बोंग याला त्यांच्या आयुष्यात अनेक संकटांचा सामना करावा लागला. फी न भरल्यामुळे त्याला संगीत शाळा सोडावी लागली. मजुरी करून आपला उदरनिर्वाह करावा लागला. चोई सुंग बोंग 2011 मध्ये tvN ऑडिशन कार्यक्रम ‘कोरियाज गॉट टॅलेंट’मध्ये भाग घेतल्यानंतर प्रसिद्धीत आला.

मीडियाला दिलेल्या मुलाखतीत गायक चोई सुंग बोंगने सांगितले की, ‘जेव्हा तो लहानपणी अनाथाश्रमातून पळून गेला तेव्हा त्याला आयुष्यात अनेक अडचणी आल्या. असे असूनही त्यांनी गायक होण्याचे स्वप्न कधीच सोडले नाही.'(south korean singer choi bong found dead at his home police suspects sucide)

अधिक वाचा –
– खिशात 500 रुपये घेऊन मुंबईत आले, नाना पाटेकरांनी केलेली मोलाची मदत; मकरंद अनासपुरेंबद्दल तुम्हाला हे माहितीये का?
– अजितदादांच्या हस्ते ‘आठवणी’ चित्रपटाचे पोस्टर लॉन्च, जाणून घ्या चित्रपटाबद्दल सर्वकाही

हे देखील वाचा