Monday, July 1, 2024

तारिक फतेह यांच्या निधनावर अनुपम खेर यांनी व्यक्त केला शोक, भावनिक नोट शेअर करत म्हणाले…

ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी पाकिस्तानी-कॅनडियन स्तंभलेखक आणि टिप्पणी करणारे तारिक फताह यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ते 73 वर्षांचे होते. कॅन्सरशी दीर्घकाळ लढा दिल्यानंतर सोमवारी (24 एप्रिल)ला तारिक यांचे निधन झाले. तारिक यांच्या स्मरणार्थ त्यांनी इंस्टाग्रामवर एक भावनिक नाेट लिहिली आहे.

अनुपम यांनी लिहिले की, “तारिक फतेह (tarek fatah) यांच्या निधनाबद्दल खूप दुःख झाले, अत्यंत निर्भीड आणि दयाळू माणूस, माझा मित्र, मनाने एक सच्चा भारतीय. ते खूप धैर्यवान होते! त्यांचे हसणे शुद्ध होते. आम्ही अनेक प्रसंगी भेटलो, परंतु टोरंटोला त्याच्या घरी दुपार चविष्ट खाद्यपदार्थ आणि अद्भुत कथांसह घालवलेले क्षण खूप खास होते. त्यांचे कुटुंब आणि मित्रांप्रती माझी संवेदना!” पोस्टसोबतच अनुपमने तारिक यांच्यासोबतचे स्वतःचे काही फोटोही शेअर केले आहेत.

त्यांच्या निधनाची बातमी त्यांची मुलगी नताशा हिने शेअर केली. त्यांनी लिहिले, “पंजाबचा वाघ. भारताचा सुपुत्र. कॅनडाचा प्रियकर. सत्य बोलणारा. न्यायासाठी लढणारा. दीन-दलितांचा आवाज. तारेक फताह यांनी दंडुका पार केली… त्यांची क्रांती त्यांना ओळखणारे आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांसाेबत चालू राहील. तुम्ही आमच्याबरोबर येणार का? 1949-2023”

 

View this post on Instagram

 

A post shared by Anupam Kher (@anupampkher)

अनुपम खेर यांच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर अभिनेता शेवटचा ‘शिव शास्त्री बलबोआ’मध्ये दिसला होते. अशात अभिनेता लवकरच ‘मेट्रो इन दिनों’मध्ये दिसणार आहे. याशिवाय तो कंगना राणौतच्या ‘इमर्जन्सी’ आणि विवेक अग्निहोत्रीच्या ‘द वॅक्सीन वॉर’मध्येही महत्त्वाच्या भूमिकेत आहे.(bollywood actor anupam kher emotional note after demise of pakistani canadian columnist tarek fatah )

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
वयाच्या 16व्या वर्षी अशी दिसत होती ‘शकुंतलम’ अभिनेत्री, फोटो पाहून तुम्ही व्हाल थक्क

शाहरुख खान ‘डंकी’च्या शूटिंगसाठी पोहोचला काश्मीरला, शूटिंगपूर्वी किंग खानचा ‘ताे’ व्हिडिओ व्हायरल

हे देखील वाचा