Tuesday, April 23, 2024

शाहरुख खान ‘डंकी’च्या शूटिंगसाठी पोहोचला काश्मीरला, शूटिंगपूर्वी किंग खानचा ‘ताे’ व्हिडिओ व्हायरल

बॉलीवूडचा बादशाह म्हटला जाणारा शाहरुख खान 2023च्या सुरुवातीपासूनच त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत आहे. जानेवारीमध्ये प्रदर्शित झालेला ‘पठाण‘ बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला आहे. अशात ‘पठाण’नंतर किंग खान ‘जवान’ आणि ‘डंकी’मुळे चर्चेत आहे. अलीकडेच त्याच्याशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो पाहिल्यानंतर असा दावा करण्यात आला आहे की, शाहरुख ‘डंकी’च्या शूटिंगसाठी काश्मीरमध्ये व्यस्थ आहे.

शूटिंगदरम्यानचा शाहरुख खानचा व्हिडिओ व्हायरल
शाहरुख खान (shahrukh khan) याची मॅनेजर पूजा ददलानी (Pooja Dadlani Gurnani) यांनी काश्मीरच्या खोऱ्यांचा एक फोटो शेअर केला आहे, जो पाहून चाहत्यांनी असा अंदाज लावला आहे की, किंग खान आणि त्याची टीम काश्मीरमध्ये आहे. दुसरीकडे, ट्विटरवर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये शाहरुख पूर्णपणे वेगळ्या लूकमध्ये दिसत आहे. या व्हिडिओमध्ये शाहरुख हॉटेलच्या दिशेने जाताना दिसत आहे. यादरम्यान शाहरुखसोबत इतर अनेक लोकही व्हिडिओमध्ये दिसत आहेत.

22 डिसेंबरला प्रदर्शित हाेणार ‘डंकी’ चित्रपट
‘डंकी’ चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार हिरानी करणार आहेत. तापसी पन्नू, विकी कौशल, बोमन इराणी आणि सतीश शाह या चित्रपटाच्या स्टारकास्टमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. शाहरुखचा हा बहुप्रतिक्षित चित्रपट यावर्षी 22 डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

शाहरुख खान ‘टायगर 3’मध्ये करणार कॅमिओ
‘डंकी’ आणि ‘जवान’ व्यतिरिक्त शाहरुख खान सलमान खानच्या ‘टायगर 3’ या चित्रपटातही कॅमिओ करत आहे. म्हणजेच ‘पठाण’ या चित्रपटानंतर प्रेक्षकांना पुन्हा एकदा सलमान आणि शाहरुखची जोडी पाहायला मिळणार आहे.(bollywood actor shahrukh khan starts shooting for dunki video of him from kashmir for film shooting goes viral )

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मोठमोठ्या लोकांवर विनोद करणाऱ्या कपिल शर्माला मुलीची ‘ती’ मागणी ऐकून फुटला होता घाम, वाचा तो किस्सा
वयाच्या 16व्या वर्षी अशी दिसत होती ‘शकुंतलम’ अभिनेत्री, फोटो पाहून तुम्ही व्हाल थक्क

हे देखील वाचा