Thursday, April 18, 2024

वयाच्या 16व्या वर्षी अशी दिसत होती ‘शकुंतलम’ अभिनेत्री, फोटो पाहून तुम्ही व्हाल थक्क

‘ऊं अटावा’ फेम साऊथ अभिनेत्री समंथा रुथ प्रभू अनेकदा चर्चेत असते. नुकताच समंथाचा ‘शाकुंतलम‘ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील तिचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला आहे. अशातच अलीकडे समंथा प्रियंका चोप्राच्या आगामी ‘सिटाडेल’ सीरिजच्या प्रीमियरला पोहोचली. यादरम्यान समांथाच्या लूकची खूप चर्चा झाली होती. अशा परिस्थितीत आता तिचा एक जुना फोटो समोर आला आहे, ज्यामध्ये तिचा लूक पाहून तुम्हीही तिच्या सौंदर्यात हरवून जाल.

समंथा रुथ प्रभू (samantha ruth prabhu) हिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर स्वतःचा एक खास फोटो शेअर केला आहे. समांथाचा हा फाेटाे तिच्या चाहत्यांसाठी एखाद्या भेटवस्तूपेक्षा कमी नाही. कारण, समांथाचा हा फोटो तेव्हाचा आहे जेव्हा ती 16 वर्षांची होती. या फोटोमध्ये ती सोफ्यावर बसलेली दिसत आहे. या फोटोमध्ये अभिनेत्रीने शॉर्ट ड्रेससह पांढरा श्रग घातला होता, तर तिने तिचे केस खुले साेडले हाेते. हा फाेटाे शेअर करत सामंथाने हार्ट इमोजी टाकून लिहिले, ‘मी 16 वर्षांची आहे.’  यासोबतच या क्लासिक फाेटाेवर चाहत्यांच्याही भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत.

samantha ruth prabhu
Photo Courtesy: Instagram/samantharuthprabhuoffl

समंथा रुथ प्रभूच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती शेवटची ‘शाकुंतलम’मध्ये दिसली होती. तिचा हा चित्रपट प्राचीन भारतातील महान कवी आणि नाटककार कालिदास यांनी लिहिलेल्या ‘अभिज्ञान शाकुंतलम’ या लोकप्रिय भारतीय क्लासिक नाटकावर आधारित होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Samantha (@samantharuthprabhuoffl)

मात्र, मंडळी आम्ही तुम्हाला सांगतो की, पॅन इंडिया चित्रपट ‘शकुंतलम’ बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला आहे. अशात समंथा लवकरच विजय देवरकोंडासोबत ‘खुशी’ या रोमँटिक चित्रपटात दिसणार आहे. केवळ समंथाच नाही तर तिचे चाहतेही या चित्रपटाबद्दल खूप उत्सुक आहेत.(bollywood shaakuntalam actress samantha ruth prabhu throwback photo when she was 16 years old from her modelling days )

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
हॉलीवूडस्टार टॉम क्रूझच्या घरापासून प्रेरित आहे ‘या’ सुपरस्टारचे कोट्यवधींचे घर, जाणून घ्या त्याच्या संपत्तीविषयी

मोठमोठ्या लोकांवर विनोद करणाऱ्या कपिल शर्माला मुलीची ‘ती’ मागणी ऐकून फुटला होता घाम, वाचा तो किस्सा

हे देखील वाचा