Tuesday, July 9, 2024

अनुपम खेर यांना आलियाचे कौतुक करताना पाहून गोंधळले युजर्स; म्हणाले, ‘कंगना कोपऱ्यात रडत…’

सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांनी रविवारी, (दि. 12 फेब्रुवारी) रोजी मुंबईत बॉलिवूड इंडस्ट्रीसाठी रिसेप्शन पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीला सर्व स्टार्सनी हजेरी लावली होती. त्याचवेळी या रिसेप्शन पार्टीत बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अनुपम खेर देखील दिसले. ज्याचा फाेटाे त्यांनी इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. मात्र, याफाेटाेमध्ये केवळ अनुपम खेरच नाही तर आलिया भट्ट देखील आहे. हा फोटो शेअर करत त्यानी ‘गंगूबाई काठियावाडी‘मधील अभिनयासाठी आलिया भट्टचे कौतुक केले आहे.

फोटो शेअर करताना अनुपम खेर (anupam kher ) यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, “प्रिय आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणीच्या रिसेप्शनमध्ये इतक्या दिवसांनी भेटून खूप आनंद झाला. तू एक्टिंग स्कूलमध्ये असताना तुझ्याशी बोलणे खूप छान वाटायचे. मी तुला जन्मजात अभिनेत्री म्हणून कसे चिडवायचाे. तुझा परफॉर्मन्स आवडला…विशेषतः ‘गंगूबाई काठियावाडी’ मधला हा सर्वात शानदार अभिनय होता. कीप गोइंग, नेहमी प्रेम आणि प्रार्थना करेल.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Anupam Kher (@anupampkher)

अनुपम खेरच्या या पोस्टनंतर इंस्टाग्रामवर युजर्सनी कमेंट्सचा भडीमार सुरू केला आहे. खरे तर, कंगना आणि आलिया भट्ट यांच्यात अनेक वाद झाले आहेत. त्यामुळे अनुपम खेरच्या या पोस्टवर युजर्स सतत कंगनाच्या बाजूने कमेंट करत आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले, ‘कंगना बी लाइक, पुन्हा माझी फसवणूक झाली.’, तर दुसर्‍या युजरने लिहिले, ‘कंगना कोपऱ्यात रडत आहे.’ अशाप्रकारे युजर्स अनुपर खेरच्या पाेस्टवर भिन्नभिन्न कमेंट करत आहेत.

या फोटोनंतर युजर्स कंगनाच्या प्रतिक्रियेची वाट पाहत आहेत. कारण, कंगना अनेकदा आलियाला टोमणे मारताना दिसते.  अनुपम खेर कंगना राणौतसोबत ‘इमर्जन्सी’ या चित्रपटात दिसणार आहेत. यापुर्वी अनुपम खेर यांनी कंगनाचेही कौतुक केले होते. ज्यासाठी अभिनेत्रीने त्यांचे आभार मानले हाेते.(bollywood actor anupam kher shared photo with actress alia bhatt users trolls kangana ranuat waiting for actress reaction)

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
प्राजक्ता माळी झाली ‘या’ नवीन संघटनेची सदस्य, सोशल मीडियावर पोस्ट्स शेअर करत दिली माहिती

समंथा रुथ प्रभूने अनवाणी पायाने 600 पायऱ्या चढून मंदिराला दिली भेट, घ्या कारण जाणून

हे देखील वाचा