Thursday, March 28, 2024

आलिया भट्ट आणि रणबीर कपूरसाठी ऑगस्ट महिना ठरणार खास, फॅन्सला मिळणार मोठे गिफ्ट

बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय कपल म्हणून रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांना ओळखले जाते. ही रील लाईफ जोडी आता रियल लाईफ जोडी झाली असून, नुकतेच ते आईबाबा देखील झाले आहेत. दोघांनी त्यांच्या करियरमध्ये एकापेक्षा एक सरस अशा चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांना त्यांच्या अभिनयासाठी अनेकदा वेगवगेळ्या पुरस्कारांनी देखील गौरवण्यात आले आहे. या दोघांचे अजून अनेक सिनेमे प्रदर्शित होणे बाकी आहे. त्यातले दोन सिनेमे ऑगस्टमध्ये प्रदर्शित होणार आहे.

रणबीर आणि आलिया या दोघांनी मोठे फॅन फॉलोविंग आहे. शिवाय या दोघांचे कपल म्हणून देखील मोठे फॅन्स आहे. अशातच २०२३मध्ये आलिया आणि रणबीर यांचे सिनेमे एकाच दिवशी समोर समोर येणार आहेत. अर्थातच दोघांचेही सिनेमा क्लॅश होणार आहे. आलाय यावर्षी तिचे हॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. ‘हार्ट ऑफ़ स्टोन’ या सिनेमात ती भूमिका साकारताना दिसणार असून, यात तिच्यासोबत गल गैडोट, जेमी डॉर्नन सहित अनेक दिग्गज कलाकार असणार आहेत. आलियाने तिच्या प्रेग्नन्सीच्या काळाच्या सुरुवातीलाच या सिनेमाची शूटिंग पूर्ण केली होती. आता तिचे फॅन्स या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहे. हा सिनेमा येत्या ११ ऑगस्ट २०२३ रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

तर दुसरीकडे याच दिवशी चित्रपटगृहांमध्ये अजून एक सिनेमा प्रदर्शित होणार आहे, आणि तो म्हणजे रणबीर कपूरचा ‘ऍनिमल’ रणबीरच्या ऍनिमलमध्ये त्याच्यासोबत रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत दिसणार असून, हा सिनेमा ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. याशिवाय याला हिंदी, तेलगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये प्रदर्शित केले जाणार आहे. ऍनिमलचे दिग्दर्शन संदीप रेड्डी यांनी केले आहे. या सिनेमाची स्टोरी एका वडील आणि मुलाच्या अवतीभोवती फिरते. हा सिनेमा एक गँगस्टर ड्रामा असून, एक मुलगा आपल्या वडिलांसाठी काय करतो ते यात दिसेल. सिनेमात बॉबी देओल देखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

इकडे आलिया भट्टच्या ‘हार्ट ऑफ स्टोन’चे दिग्दर्शन टॉम हार्पर यांनी केले असून, ग्रेग रुका आणि एलीसन श्रोएडर यांनी हा सिनेमा लिहिला आहे. राहेल स्टोनच्या अवतीभोवती फिरणाऱ्या या सिनेमात ती एक गुप्तहेर आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
हंसिका मोटवानीच्या लग्नावर येतोय नवीन शो, ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित
आरोह वेलणकरने पोस्ट शेअर करत बिग बॉसमधल्या ‘त्या’ अनुभवांबद्दल व्यक्त केल्या भावना

हे देखील वाचा