Wednesday, June 26, 2024

IFFIच्या ज्युरी प्रमुखाच्या वक्तव्यावर अनुपम खेर संतापले; म्हणाले, ‘लॅपिडला लाज वाटली पाहिजे’

32 वर्षांनंतर जेव्हा विवेक अग्निहोत्री यांनी काश्मिरी पंडितांच्या हत्याकांडाची कहाणी चित्रपटाच्या रूपात सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यावर बरीच टिका झाली. कधी चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी होती, तर कधी काश्मिरी पंडितांची ही कथा काल्पनिक असल्याचे सांगण्यात आले. चित्रपट प्रदर्शित होऊन नऊ महिने झाले आहेत. मात्र, वाद अजूनही सुरूच आहे.

ज्युरी प्रमुखांनी ‘द कश्मीर फाइल्स’ला म्हटलं, ‘व्हल्गर’ अन् ‘प्राेपगंडा’
खरं तर, गोव्यात नुकत्याच झालेल्या 53व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI) ज्युरींच्या प्रमुखांनी ‘द काश्मीर फाइल्स’वर प्रश्न उपस्थित केले होते. ज्युरी प्रमुख आणि इस्रायली चित्रपट निर्माते नदाव लॅपिड (nadav lapid) म्हणाले, “हा एक व्हलगर आणि प्राेपगंडावर आधारित चित्रपट आहे, इतक्या प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवाच्या स्पर्धा विभागात त्याचे नाव पाहून मला आश्चर्य वाटते.” चित्रपट निर्मात्याच्या या वक्तव्यावरून आता वाद सुरू झाला आहे. यावर अनुपम खेर यांनीही प्रतिक्रिया दिली.

अनुपम खेर यांनी ट्विट करत दिली प्रतिक्रिया
अनुपम खेर (anupam kher) यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, “खोट्याची उंची कितीही जास्त असली, तरी सत्याच्या तुलनेत ते नेहमीच लहान असते. यासोबतच अभिनेत्याने ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटातील त्याचे फोटोही शेअर केले आहेत.”

माध्यमातील वृत्तानुसार, अनुपम खेर यांनी ट्विट व्यतिरिक्त म्हटले आहे की, “आम्ही ज्युरी प्रमुख आणि इस्रायली चित्रपट निर्माते नदाव लॅपिड यांना योग्य उत्तर देऊ. होलोकॉस्ट (holocaust) खरा असेल, तर काश्मिरी पंडितांचे निर्गमनही (exodus) खरे आहे. टूलकिट टोळी सक्रिय झाल्यानंतर लगेचच हा प्रकार घडला, हे प्रीप्लांड असल्याचे दिसते. त्यांनी असे वक्तव्य करणे लज्जास्पद आहे.” (bollywood actor anupam kher tweet and reacted on the statement of nadav lapid the kashmir files is a propenda at iffi)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
Birthday: लग्नाआधी लिव्ह-इनमध्ये होती नेहा पेंडसे, तर दोन मुलींचा पिता आहे अभिनेत्रीचा पती

लग्नाबद्दल होणाऱ्या ट्रोलिंगवर मराठमोळ्या नेहा पेंडसेची प्रतिक्रिया, म्हणाली ‘माझ्या पतीला त्रास…’

हे देखील वाचा