Saturday, December 7, 2024
Home टेलिव्हिजन सिद्धांतच्या मृत्यूने विवेक अग्निहोत्रीला बसला धक्का, ट्विट करत म्हणाले…

सिद्धांतच्या मृत्यूने विवेक अग्निहोत्रीला बसला धक्का, ट्विट करत म्हणाले…

कसौटी जिंदगी की’ टीव्ही मालिका फेम अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशी यांचे वयाच्या 46 व्या वर्षी निधन झाले. माध्यमातील वृत्तानुसार, वर्कआउट दरम्यान तो अचानक बेशुद्ध पडला, त्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, पण डॉक्टर त्याला वाचवू शकले नाहीत. त्याच्या अचानक जाण्याने छोट्या पडद्यावरील सेलिब्रिटींसह बॉलिवूड सेलिब्रिटींनाही धक्का बसला आहे. कश्मीर फाइल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी अभिनेत्याच्या निधनाची बातमी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी अभिनेत्याच्या मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त केले आहे तसेच आजच्या हेवी वर्कआउटवरही प्रश्न उपस्थित केले आहेत.

विवेक अग्निहाेत्री (Vivek Agnihotri) यांनी ट्विट करत लिहिले की, “हे खूप दुःखद आहे. कोणत्याही वैद्यकीय सल्ल्याशिवाय शरीर तयार करण्याची घाई अत्यंत धोकादायक आहे. हायपर जिमिंग हा एक नवीन प्रकारचा वेडेपणा आहे जो इन्स्टाग्रामद्वारे चालविला जात आहे. हे निश्चितपणे थांबवले पाहिजे. समाजातील लोकांनी याचा पुनर्विचार करण्याची गरज आहे.”

याआधी प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Shrivastav) यांनाही वर्कआउट दरम्यान हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांना बराच काळ दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टर त्यांना वाचवू शकले नाहीत. याआधी गेल्या वर्षी अभिनेता सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla) यांचेही  हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सिद्धार्थला जिम करत असताना हृदयविकाराचा झटका आला आणि त्याला तातडीने कूपर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

सिद्धांत वीर सूर्यवंशी (Siddhaanth Vir Surryavanshi ) यांच्या कारकिर्दीबद्दल बाेलायचे झाले तर, त्यांनी एकता कपूरच्या ‘कुसुम’ या मालिकेतून टीव्हीवर पदार्पण केले. या मालिकेनंतर त्याने ‘जमीन से आकाश तक’, ‘विरुध्द’, ‘भाग्य विधाता’, ‘कृष्णा अर्जुन’, ‘कसौटी जिंदगी की’,’ममता’ आणि ‘कैनात’ यासारख्या अनेक दमदार मालिकांमध्ये काम केले. (vivek agnihotri post on siddhaanth vir surryavanshi said hyper gymming needs to be regulated)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
एकट्या सिद्धांत सुर्यवंशीने नाही, तर ‘या’ कलाकारांनीही वर्कआउट करताना गमावले प्राण

अभिनेत्री शरवरी वाघच्या हॉट लुकने फुलले सौंदर्य, फोटो होताय तुफान व्हायरल…

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा