Thursday, June 13, 2024

‘देव या सुंदर जोडप्याला…’, आशिष विद्यार्थीच्या हनिमून फाेटाेंवर चाहत्यांनी केला प्रेमाचा वर्षाव, म्हणाले…

अभिनेता आशिष विद्यार्थी आणि रुपाली बरुआ यांनी मे महिन्यात कोलकाता येथे लग्न केले. लग्नानंतर दोघेही सध्या सुट्टी साजरी करत आहेत. अशात आशिष यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर रुपालीसोबतच्या सुट्टीचे फोटो शेअर केले आहेत. माध्यमातील वृत्तांनुसार, दोघेही सध्या सिंगापूरमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत.

अभिनेते आशिष विद्यार्थी (ashish vidyarthi) यांनी शेअर केलेले फाेटाे अनेकांना आवडले आहेत. एका युजरने इंस्टाग्रामवर कमेंट करत लिहिले की, “हे खूप सुंदर फोटो आहेत सर.”, तर दुसर्‍या युजरने कमेंट केली की, “देव या सुंदर जोडप्याला आशीर्वाद देवो.” अशात एका युजरने कमेंट करत लिहिले की, “सुंदर जोडपे, सुंदर कॅप्चर.”

गेल्या महिन्यात अभिनेत्याने रुपालीशी कोलकाता येथे एका खासगी समारंभात लग्न केले. आशिष यांचे हे दुसरे लग्न आहे.  लग्नासाठी अभिनेत्यानी ऑफ-व्हाइट एथनिक पोशाख परिधान केला होता, तर रूपालीने पांढरी आणि सोनेरी साडी निवडली होती. रुपालीपूर्वी अभिनेत्याचा विवाह राजोशी बरुआसोबत झाला होता. मात्र, 2022 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.

वयाच्या 57व्या वर्षी दुसरे लग्न केल्यामुळे अभिनेत्याला सोशल मीडियावर खूप ट्रोल केले जात होते. अशात अभिनेत्यानी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक पाेस्ट शेअर केली हाेती, ज्यामध्ये ते म्हणतात की, “मी विश्वातून जोडीदार मागितला होता आणि मी कोणालातरी भेटलो. त्याच्याशी बोलल्यानंतर मला समजले की, मला माझे संपूर्ण आयुष्य त्याच्यासोबत घालवायचे आहे. रुपाली बरुआ असे तिचे नाव आहे.’ असे अभिनेत्याने मत व्यक्त करत सांगितले. (bollywood actor ashish vidyarthi drops picture with newlywed wife rupali barua from their vacation)

अधिक वाचा-
डान्सर गौतमी पाटील चर्चेत, माय-लेकीचा ‘तो’ व्हिडीओ झाला व्हायरल 
‘बहरला हा मधुमास’ गाण्याची अनुपमाला पडली भुरळ, ‘गुरु माँ’साेबत दिसली ठुमके लावताना

हे देखील वाचा