Thursday, June 13, 2024

‘बहरला हा मधुमास’ गाण्याची अनुपमाला पडली भुरळ, ‘गुरु माँ’साेबत दिसली ठुमके लावताना

टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय शो ‘अनुपमा‘ मधील रुपाली गांगुलीच्या दमदार अभिनयाचे खूप कौतुक होत आहे.  रूपालीला तिच्या पात्रासाठी आणि मालिकेतील अभिनयासाठी प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळत आहे. अशात रुपाली सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांशी कायमच जोडलेली असते आणि चाहत्यांसाठी मनोरंजक व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असते. अशात रुपालीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शाेमध्ये ‘गुरु माँ’ बनलेल्या अपरा मेहतासोबतचा तिचा डान्स व्हिडिओ शेअर केला आहे, जाे साेशल मीडियावर तुफान व्हायरल हाेत आहे.

रुपाली गांगुली (rupali ganguli)हिने सोशल मीडिया हँडलवर तिच्या ऑन-स्क्रीन ‘गुरु माँ’ उर्फ ​​अपरा मेहतासोबतचा एक रील शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये रुपाली आणि अपरा (apra mehta) ‘बहरला हा मधुमास’ या व्हायरल गाण्यावर हुक स्टेप करताना दिसत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rups (@rupaliganguly)

अनुपमा म्हणजेच रुपाली गांगुलीचा हा व्हिडिओ समाेर येताच चाहत्यांनी आणि कलाकारांनी कमेंट करायला सुरुवात केली आहे. अपरा मेहताने पोस्टवर कमेंट करत लिहिले की, “प्रिय रुपाली तुझ्यासोबत अभिनय करताना खूप आनंद झाला…तू अशा कालाकरांपैकी एक आहेस ज्यांचा अभिनय इतरांपेक्षा वेगळा आहे. प्लीज नेहमी अशी नम्र रहा. देव तुझे भले करो.” तर अनेक चाहत्यांनी दोन्ही अभिनेत्रींच्या नृत्याचे कौतुक केले आहे. तर एकाने लिहिले, “खूप क्यूट”.

मंडळी, ‘अनुपमा’चा प्रीमियर 13 जुलै 2020 रोजी स्टार प्लसवर झाला. यामध्ये रुपाली गांगुली, गौरव खन्ना आणि सुधांशू पांडे यांच्या व्यतिरिक्त मदालसा शर्मा चक्रवर्ती, सागर पारेख, निधी शाह, आशिष मेहरोत्रा, मुस्कान बामणे, अश्लेषा सावंत आणि इतर अनेक कलाकार आहेत.(tv actress anupamaa rupali ganguli aka anupama and apra mehta aka gurumaa danced together share video)

अधिक वाचा-
डान्सर गौतमी पाटील चर्चेत, माय-लेकीचा ‘तो’ व्हिडीओ झाला व्हायरल
27 वर्षीनी लहान अभिनेत्रीसाेबत नवाजुद्दीनने केले लीप-लॉक किसिंग; नेटकऱ्यांचा संताप अनावर

हे देखील वाचा