Thursday, December 26, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘ती 50 वर्षांची आहे अन् मी…’, रुपालीसोबतच्या दुसऱ्या लग्नावर आशिष विद्यार्थी म्हणाले, ‘वयाचा फरक पडत नाही’

बॉलिवूड अभिनेता आशिष विद्यार्थी यांनी वयाच्या 57व्या वर्षी दुसरे लग्न करून चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. अभिनेत्याने बिझनेसमन रुपाली बरुआसोबत लग्न केले आहे. आशिष आणि रुपाली यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहेत. अशात आता आशिष विद्यार्थ्या यांनी लग्नानंतरचा स्वतःचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ते म्हणाले की, ‘वयाचा काही फरक पडत नाही.’

आशिष विद्यार्थी (ashish vidyarthi ) यांनी त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर स्वतःचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ते म्हणता की, “मी विश्वातून जोडीदार मागितला होता आणि मी कोणालातरी भेटलो. त्याच्याशी बोलल्यानंतर मला समजले की, मला माझे संपूर्ण आयुष्य त्याच्यासोबत घालवायचे आहे. रुपाली बरुआ असे तिचे नाव आहे.

अभिनेत्याने पुढे सांगितले की, ‘संभाषणादरम्यान आम्हाला एकमेकांबद्दल काहीतरी मनोरंजक कळले आणि मग आम्हाला वाटले की, आम्ही पती-पत्नी म्हणून एकत्र राहू शकतो. म्हणून रुपाली आणि माझं लग्न झालं. ती पन्नासची आणि मी सत्तावनच आहे. मात्र, वय काही फार मॅटर नाही करत माझ्या मित्रा. आपल्यापैकी प्रत्येकजण आनंदी होऊ शकतो. आपले वय काहीही असाे मग, बरोबर ना? लोक त्यांचे जीवन कसे जगत आहेत याचा आपण आदर करूया.’

याशिवाय आशिष विद्यार्थी त्यांची पहिली पत्नी पिलू विद्यार्थीबद्दलही बाेले आहेत. त्यांनी सांगितले की, ‘ते आणि पीलू त्यांच्या लग्नाने खुश नव्हते. अशा परिस्थितीत एकमेकांशी बोलून ते एकमेकांच्या संमतीने वेगळे झाले. इतकेच नव्हे, तर आशिष आणि पीलूनेही मुलगा अर्थ, कुटुंब आणि जवळच्या लोकांचाही सल्ला घेतला होता.’ पीलू विद्यार्थ्यापासूनच्या घटस्फोटाबाबत अभिनेत्याने सांगितले की, ‘आम्ही शालीनतेने आणि सन्मानाने घटस्फोट घेण्याचे ठरवले होते आणि त्यानंतर आम्ही वेगळे झालो.'(bollywood actor ashish vidyarthi reaction on marriage with rupali barua says she is 50 and im 57 watch video)

हे देखील वाचा