Saturday, June 15, 2024

प्रियांकाचे रक्ताने माखलेले कपाळ अन् निळा पडलेला चेहेरा पाहून चिंतेत पडले चाहते, काय आहे प्रकरण? लगेच वाचा

ग्लोबल आयकॉन प्रियांका चोप्रा तिच्या स्क्रीन प्रेझेन्सने प्रेक्षकांना थक्क करण्यात कोणतीही कसर सोडत नाही. तिचा चित्रपट असो किंवा सीरिज, ती त्यात जीव फुंकते. प्रियांका चोप्रा ही बॉलिवूडची सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे आणि तिने हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप साेडली आहे. अशात अलीकडेच देसी गर्ल प्रियांका चोप्राने तिच्या इन्स्टा अकाऊंटवर असे काही फोटो शेअर केले आहेत, जे पाहिल्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांची चिंता वाढली आहे. या फोटोंमध्ये प्रियांका चोप्राच्या कपाळ आणि नाकातून रक्त येत आहे. काय आहे नेमके प्रकरण? चला, जाणून घेऊया…

प्रियंका चोप्रा ( priyanka chopra) हिने गुरुवारी (दि. 25 मे)ला तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये ती सिटाडेलच्या सेटवर अ‍ॅक्शन करताना दिसत आहे. यानंतर आता क्वांटिको अभिनेत्रीने तिच्या इन्स्टा स्टोरीवर एक कोलाज फोटो शेअर केला आहे.

priyanka chopra
Photo Courtesy: Instagram/priyankachopra

शेअर केलेल्या पहिल्या फाेटाेमध्ये अभिनेत्रीच्या नाकातून रक्तस्त्राव होत असून तिची संपूर्ण हनुवटी रक्ताने माखलेली आहे, तर दुसऱ्या फाेटाेत अभिनेत्रीच्या डोक्यातून रक्तस्त्राव होत आहे. इतर दोन फाेटाेंमध्ये, अभिनेत्रीच्या डाेळ्याखाली जखम देखील दिसत आहे. याशिवाय प्रियांकाने आणखी एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती डोळे मिचकावताना दिसत आहे. प्रियांकाची ही सर्व फाेटाे तिच्या अमेझॉन प्राइम व्हिडिओ सीरीज सिटाडेलच्या सेटवरील आहेत, ज्यात अभिनेत्री पूर्णपणे शुटदरम्यान आनंद घेत असल्याचे दिसते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Priyanka (@priyankachopra)

अशात आता प्रियांका चोप्राने तिच्या इन्स्टा स्टोरीवर चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे की, तिच्या अॅमेझान प्राइम सीरीज ‘सिटाडेल’चा दुसरा सीझन येत आहे. याचा अर्थ प्रियांका शोमध्ये पुन्हा एकदा रिचर्ड मॅडनसोबत दिसणार आहे.(bollywood actress priyanka chopra shares injured photo from sets of citadel )

हे देखील वाचा