Thursday, October 16, 2025
Home बॉलीवूड आयुष्मान खुरानाचं ‘रातां कालियां’ गाणं रिलीज; युजर्स काैतुक करत म्हणाले, ‘मन जिंकलं…’

आयुष्मान खुरानाचं ‘रातां कालियां’ गाणं रिलीज; युजर्स काैतुक करत म्हणाले, ‘मन जिंकलं…’

बाॅलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना अभिनयासोबतच गायनानेही चाहत्यांची मने जिंकतो. आज मंगळवारी (4 जुलै)ला अभिनेत्याचे नवीन गाणे ‘रातां कालियां’ रिलीज झाले आहे. आयुष्मानने सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांना याची माहिती दिली आहे. आयुष्मानच्या या गाण्याची चाहते आतुरतेने वाट पाहत होते आणि आज त्यांची प्रतीक्षा संपली आहे.

आयुष्मान खुराना (ayushmann khurrana) याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून या गाण्याच्या रिलीजची माहिती शेअर केली आणि लिहिले, ‘माझ्या हृदयाचा हा छोटा तुकडा आजपासून तुझा आहे. अगदी नवीन ट्रॅक आता आऊट झाला आहे.’ ‘रातां कालियां’ हे गाणे आयुष्मान खुरानाने गायले आहे. हे गाणं रिलीज हाेताच चाहत्यांच्या पसंतीच उतरले आहे.

‘रातां कालियां’ या गाण्याचे बोल गुरप्रीत सैनी आणि गौतम शर्मा यांनी लिहिले आहेत. त्याचवेळी आयुष्मानचा आवडता संगीतकार रोचक कोहली याने त्याची धून तयार केली आहे. आयुष्यमान खुरानाच्या वर्क फ्रंटबद्दल बाेलायचे झाले, तर अभिनेता आगामी ‘ड्रीम गर्ल 2’ या चित्रपटात अभिनय करताना दिसणार आहे. यामध्ये तो अनन्या पांडेसोबत पहिल्यांदाच काम करत आहे. हा चित्रपट 25 ऑगस्ट 2023 रोजी सिनेमागृहामध्ये प्रदर्शित हाेणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ayushmann Khurrana (@ayushmannk)

आयुष्मानच्या ‘रातां कालियां’ गाण्यावर चाहत्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया दिल्या आहेत. प्रत्येकजण अभिनेत्याचे कौतुक करताना दिसत आहे. एका युजरने अभिनेत्याचे काैतुक करत लिहिले की, ‘हे हृदयाला स्पर्श करणारे गाणे आहे.’, तर आणखी एका युजरने लिहिले की, ‘तुम्ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वोत्तम आहात.’ अशात एका युजरने कमेंट करत लिहिले की, ‘तुझा लूक, तुझा अभिनय आणि तुझा आवाज… सर्व काही अप्रतिम आहे.’ याशिवाय आयुष्मान खुराना त्याच्या आंतरराष्ट्रीय दौऱ्यामुळेही खूप चर्चेत आहे.(bollywood actor ayushmann khurrana rochak kohli new song raatan kaaliyan out now know netizens reaction)

अधिक वाचा-
एकता कपूरने फाडला हाेता स्मृती इराणींचा कॉन्ट्रॅक्ट; वर्षांनंतर केला खुलासा, म्हणाली…
किशाेरवयात तेजस्वीचा झाला हाेता विनयभंग; खुलासा करत म्हणाली,’मी रस्त्यावर एकटी हाेती अन् दोन मुलं…’

हे देखील वाचा