Tuesday, June 25, 2024

‘आईची काळजी…’, आयुष्मान खुरानाने वडिलांच्या निधनानंतर शेअर केलेली हृदयस्पर्शी पोस्ट व्हायरल

आयुष्मान खुराना आणि अपारशक्ती खुराना यांचे वडील पी. खुराना यांचे 19 मे रोजी निधन झाले. पी. खुराना हे प्रसिद्ध ज्योतिषी होते. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वयाच्या 72 व्या वर्षी पी. खुराना यांनी चंदीगडच्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला.

वडिलांच्या जाण्याने खुराना ब्रदर्सला मोठा धक्का बसला. संपूर्ण चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली होती. कलाकार आणि अनेक चाहत्यांनी पी. खुराना यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली वाहिली. तसेच खुराना ब्रदर्सबद्दल शोक व्यक्त केला. आता आयुष्मान खुरानाने इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये तो आपल्या वडिलांची आठवण करत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ayushmann Khurrana (@ayushmannk)

आयुष्मान खुराना आणि त्याचे कुटुंब त्याच्या वडिलांच्या आकस्मिक निधनाने खूप दु:खी झाले होते, परंतु आता अभिनेत्याने सोशल मीडियाद्वारे वडिलांच्या निधनाबाबद दुःख व्यक्त केले आहे आणि या कठीण काळात त्याल्या मदत करणाऱ्या सर्व लोकांचे आभार मानले आहेत. आयुष्मान खुरानाने सोशल मीडियावर काही फोटो शेअर करून वडिलांना गमावल्याचे दुःख व्यक्त केले आहे.

पोस्ट शेअर करताना आयुष्मानने लिहीले की, आईची काळजी घ्यायची आहे. नेहमीच तिच्या सोबत राहायंच आहे. वडिलांसारख बनायला वडिलांपासून लांब जाव लागतं. पहिल्यांदाच असं वाटतं आहे की, बाबा खूप लांब आणि आमच्या खूप जवळ आहेत. त्याच बरोबर शेअर केलेल्या फोटोंमध्ये आयुष्मान, त्याची आई आणि अपारशक्ती खुराना दिसत आहेत.

आयुष्मान खुरानाच्या या पोस्टवर चाहत्यांसह अनेक सिनेतारकांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. अर्जुन कपूरने लिहिले की, ‘त्याचे व्यक्तिमत्त्व मजबूत आणि शांत होते. त्याच्याशी बोलण्यात नेहमीच आनंद वाटायचा. देव तुम्हा सर्वांना या दु:खतून सावरण्याची हिम्मत देवो. दरम्यान, आयुष्मान खुराना लवकरच ड्रीम गर्ल 2 या चित्रपटात दिसणार आहे. यात त्याच्यासोबत अनन्या पांडेही दिसणार आहे. (Ayushmann Khurrana shared a heart touching post after the death of his father P Khurrana)

हे देखील वाचा