Sunday, December 3, 2023

आयुष्मानची पत्नी कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ आली पुढे, काय म्हणाली ताहिरा? व्हिडिओ एकदा पाहाच

देशातील कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ अनेक बॉलिवूड स्टार्स आणि टीव्ही स्टार्स पुढे आले आहेत. अशात आता या यादीत अभिनेता आयुष्मान खुरानाची पत्नी ताहिरा कश्यपचेही नाव जोडले गेले आहे. खरेतर ताहिरानेही राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील जंतरमंतरवर सुरू असलेल्या कुस्तीपटूंच्या निषेधार्थ आवाज उठवला आहे.

आयुष्मान खुराना (ayushmann khurrana) याची पत्नी ताहिरा कश्यप (tahira kashyap) हिने गुरुवार, 2 जून रोजी कुस्तीपटूंच्या निषेधाचे समर्थन करत सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये अभिनेत्याच्या पत्नीने स्वत: लिहिलेली एक कविता वाचून दाखवली आहे. देशातील कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ पुढे आलेल्या ताहिराने हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

दरम्यान, कुस्तीपटूंच्या निषेधावर आपले मत न दिल्याने सेलेब्सची इंटरनेटवर जाेरदार टिका केली जात आहेत. नेटिझन्सनी निदर्शनास आणून दिले की, सेलेब्सने देशासाठी पदके जिंकल्याचे पोस्ट केले होते, पण आता त्यांना खरोखर समर्थनाची गरज असल्यास गप्प बसले आहेत. या सगळ्यात काही सेलिब्रिटींनी नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाच्या दिवशी कुस्तीपटूंवर दिल्ली पोलिसांनी केलेल्या क्रूर कारवाईचा निषेध केला.

एक व्हिडिओ शेअर करत स्वरा भास्करने लिहिले, “लज्जास्पद आहे की, आमच्या सर्वोच्च आंतरराष्ट्रीय खेळाडूंना लैंगिक छळाच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यास भाग पाडले जात आहे आणि आरोपी भाजप खासदाराला सरकारकडून सतत संरक्षण दिले जात आहे. डिसमिस करा आणि ब्रिजभूषण सिंग यांना तपासा.” या साेबतच टोविनो थॉमस, कमल हासन, प्रकाश राज आणि सोनू सूद यांनीही पोलिसांच्या कारवाईचा निषेध केला.

साक्षी मलिक, विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांच्यासह अनेक ऑलिम्पिक आणि इतर जागतिक विजेते कुस्तीपटू भारतीय कुस्ती महासंघाचे माजी प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या अटकेची मागणी करत दिल्लीच्या रस्त्यावर उतरले आहेत. बृजभूषण यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप आहे.(bollywood actor ayushmann khurrana wife tahira kashyap now came out in support of the wrestlers targeted through poetry)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही नक्की वाचा-
अधुरी प्रेम कहाणी! नर्गिस दत्त यांच्या लग्नाची बातमी समजल्यानंतर राज कपूर स्वतःलाच देऊ लागले होते सिगारेटचे चटके

‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम अभिनेता गंभीर जखमी; अभिनेत्री श्वेता मेहंदळेने दिली ‘ही’ माहिती

हे देखील वाचा