Wednesday, December 6, 2023

‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम अभिनेता गंभीर जखमी; अभिनेत्री श्वेता मेहंदळेने दिली ‘ही’ माहिती

झी मराठीवरील ‘माझ्या नवऱ्याची बायको‘ ही मालिका प्रचंड गाजली. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने आपल्या अभिनयाच्या जोरावर एक विषेश ओळख निर्माण केली आहे. रसिकांना देखील या मालिकेला भरभरून प्रतिसाद दिला आहे. या मालिकेत राधिकाला अडचणीच्या काळात मदत करणारी तिची मैत्रिण म्हणजे रेवती. रेवतीचे पात्र प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता मेहंदळे हिने साकारले आहे. ती सोशल मीडियावर सक्रिय असते.

श्वेता (Shweta Mehendale) तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. त्यामुळे ती नेहमीच चर्चेत येते. श्वेताचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. तिचे चाहते तिच्या पोस्टवर भन्नाट कमेंट करत असतात. श्वेता कधी तिच्या पतीसोबतचे तर कधी तिच्या मित्रांसोबतचे फोटो शेअर करत असते. यादरम्यान श्वेताने तिचा मित्रासोबतचा असलेला फोटो शेअर केला आहे. जो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या पोस्टमध्ये तिने अभिनता यश प्रधानला दुखापत झाल्याचे सांगितले आहे. यशने ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत सुबोध गुप्तेची भूमिका साकारली आहे.

इन्स्टाग्रामवर पोस्ट करताना श्वेताने कॅप्शनमध्ये लिहीले की, “काहीवेळासाठी सर्व काही जागीच ठप्प झाले आहे. कारण या माणसाने माझ्या आईच्या घरातील सामान दुसरीकडे शिफ्ट करण्यासाठी मला खूप मदत केली आहे. पण त्याचवेळी त्याच्या हाताच्या मनगटचे हाड मोडले आहे. ओम प्रधान आणि अपेक्षा चौकसी मी तुमच्या प्रत्येक गोष्टीसाठी तुमचे आभार शब्दात व्यक्त करु शकत नाही.” श्वेताने शेअर केलेल्या या पोस्टवर नेटकरी कमेंट करत आहेत.

या पोस्टमधील फोटोमध्ये यशचा हात फ्रॅक्चर झाल्याचे दिसत आहे. हे पाहून चाहते देखील त्याची काळजी करत आहेत. यावर कमेंट करताना एका युजकने लिहीले की, “खूप काळजी घे, असा मित्र मिळायला नशीब लागत.” तर दुसऱ्या युजरने त्याला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. इतकच नाही तर यावर यशने देखील प्रतिक्रिया दिली आहे. त्याने लिहीले की, ‘बाप रे.’ त्यावर श्वेताने रिप्लाय देत लिहीले की, ‘तू बाप रे’ त्यामुळे ही पोस्ट चर्चेत आली आहे. (Majhya Navaryachi Bayko actor Yash Pradhan seriously injure)

 

View this post on Instagram

 

A post shared by Shweta Mehendale (@shwetamehendale)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही नक्की वाचा-
अधुरी प्रेम कहाणी! नर्गिस दत्त यांच्या लग्नाची बातमी समजल्यानंतर राज कपूर स्वतःलाच देऊ लागले होते सिगारेटचे चटके
एका चापटीने बदलवले होते हिंदी चित्रपटसृष्टीतील राज कपूर यांचे नशीब, कमी वयातच मिळाली ‘शोमॅन’ ओळख

हे देखील वाचा