Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

छोटा पॅकेट बडा धमाका! ओळखलं का ‘या’ बॉलिवूड स्टारला? लाखो मुलींच्या हृदयावर करतो राज्य

प्रेक्षक नेहमी कलाकाराबद्दल जास्त माहिती जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. त्याच्या अभिनयापासून ते वैयक्तीक आयुष्याबद्दल माहिती जाणून घ्यायला प्रत्येकालाच आवडते. त्यामुळे सेलिब्रिटी आपल्या सोशल मीडियाद्वारे आपले फोटो शेअर करत असतात आणि चाहतेही यावर प्रतिक्रिया देत असतात. अशातच एका अभिनेत्याने त्याचा लहानपणीचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सेलिब्रिटी नेहमी चर्चेत राहण्यासाठी प्रेक्षकांचे लक्ष वेधन्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे सोशल मीडियाद्वारे फोटो किंवा व्हिडिओ शेअर करुन चाहत्यांना खूश करत असतात. त्यांचे चाहते त्यांच्या पोस्टला एवढं पसंद करतात की त्याला तुफान व्हायरल करुन ठेवतात. आज असाच एक फोटो सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये आपल्या आईच्या मांडीवर दोन वेळ्या घालून बसलेला हा छोटा मुलगा आज अभिनय क्षेत्रात धमाल करत आहे. तो बॉलिवूड इंडस्ट्रीचा सुपरस्टार बनला आहे. त्याने खूप कमी वेळात प्रेक्षकाच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. आज तो लाखो लोकांच्या मनावर राज्य करत आहे.

हा कलाकार दुसरा तिसरा कोणी नसून कार्तिक आर्यन(Kartik Aaryan) आहे. याने आपल्या अभिनयाची सुरुवात चित्रपट ‘प्यार का पंचनामा‘(Pyar Ka Punchnama) पासून केली होती. यानंतर त्याने आपल्या करिअरमध्ये कधीच मागे वळून पाहिले नाही.  त्याला या चित्रपटामध्ये हवी तशी ओळख मिळाली नव्हती. यानंतर कार्तिक आर्यन याने ‘सोनू के टीटू की स्वीटी'(Sonu Ke Titu Ki Sweety) या चित्रपटामध्ये काम केले आणि त्याला हवी तशी प्रसिद्धी मिळाली होती. त्याला लोक ओळखू लागले होते यानंतर कार्तिकने अनेक गाजणाऱ्या चित्रपटामध्ये काम केले.

कार्तिक आर्यन याचा ‘भूल भुलैया २‘(Bhul Bhulaiya 2) हा चित्रपट खूपच गाजला होता, त्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूप धमाल केली होती. त्यानंतर कार्तिकचीही खूपच क्रेज वाढली आहे. तो बॉलिवूडच्या सुपरस्टार कलाकारपैकी त्याला ओळखले जाते. तरुण पिढीमध्ये कार्तिकची खूप क्रेज आहे. तो नेहमी चर्चेत असतो त्याचा काही दिवसापूर्वी सोशल मीडियावर विमानातील व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्याचा साधा अंदाज पाहून चाहते अजून जास्त फॅन झाले आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा
अभिनेत्री रसिकासाठी नवरात्र आहे खूपच खास, 250 नेत्रहीन मुलींसोबत लुटला गरब्याचा आनंद
इंडियन आयडॉलवर संतापले प्रेक्षक, थेट बॉयकॉट करण्याची केली मागणी
अभिनव शुक्ला ‘या’ आजाराने आहे ग्रस्त, तर आजार स्वीकारण्यास लागली तब्बल 20 वर्षे

हे देखील वाचा