Thursday, June 13, 2024

प्रसिद्ध अभिनेता जाणार चंद्रावर, बातमी कळताच आनंदाला उधाण

बालवीर म्हणजेच टीव्ही जगतातील लाेकप्रिय अभिनेते आणि मुलांचे लाडके देव जोशी याचे चंद्रावर जाण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. आता देव जोशी चंद्रावर चालणार नाहीत तर प्रत्यक्षात उतरणार आहेत. खुद्द देवने त्याच्या सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे. चंद्रावर जाण्याची बातमी शेअर करत देव यांनी याला स्वप्न पूर्ण झाल्याचे म्हटले आहे.

अभिनेता देव जाेशी (dev joshi) यांनी त्यांच्या सोशल मीडियावर लिहिले की, “हे स्वप्न सत्यात उतरल्यासारखे आहे, ड्रीम मून प्रोजेक्टचा भाग बनून खूप आनंद होत आहे. हा आनंद मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. या अनपेक्षित आणि अविश्वसनीय प्रकल्पाचा भाग बनून मला खूप आनंद होत आहे. आयुष्य मला नेहमीच आश्चर्यचकित करते.” देव जोशी यांची डिअर मून मोहिमेसाठी जपानच्या यासुका मीझावा यांनी निवड केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Dev Joshi (@devjoshi28)

देव या मिशनमध्ये निवडलेल्या 10 सदस्यांपैकी एक आहे. यासुका मेझावा यांनी #DearMoon सुरू केले. या मिशनसाठी जगभरातून 10 जणांची निवड करण्यात आली आहे. या मिशनमध्ये देव जोशी यांचेही नाव फायनल झाले आहे. माध्यमातील वृत्तानुसार, पुढील वर्षी या मोहिमेला वेग येईल. त्यासाठीची तयारी जोरात सुरू आहे. निवडलेल्या सर्व 10 लोकांची वैद्यकीय चाचणी केली जाईल. त्यानंतरच नावांची अंतिम निवड केली जाईल. या सहलीच्या माध्यमातून चंद्राची सफर सुमारे 1 आठवड्यात केली जाईल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Dev Joshi (@devjoshi28)

टीव्ही जगतातील प्रसिद्ध अभिनेता देव जोशी यांनी अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. देवची ‘बालवीर’ ही सर्वात लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेत देवने बालवीरची मुख्य भूमिका साकारली आहे. वयाच्या अवघ्या 3व्या वर्षापासून अभिनयविश्वात सक्रिय असलेल्या देव जोशी यांनी अगदी लहान वयातच चाहत्यांच्या मनात स्थान मिळवले आहे. (bollywood actor dev joshi joins japanese billionaires crew for dearmoon spacex mission baalveer)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
जरा इकडे पाहा! नव्या अन् सिद्धांत कारमध्ये दिसले एकत्र; नजर पडताच लाजली बिग बींची नात
काजल अगरवालच्या सिंपल लूकने चोरली लाइमलाइट, फोटोंचा सोशल मीडियावर कहर

हे देखील वाचा