बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी ही नेहमीच तिचा टोन्ड फिगर फ्लॉन्ट करताना दिसत असते. दिशा तिच्या हॉट आणि बोल्ड अंदाजासाठी नेहमीच चाहत्यांमध्ये चर्चेत असते. तिचा फिगर पाहून चाहते घायाळ होत असतात. सोशल मीडियावरही दिशाचे एकापेक्षा एक फोटो व्हिडिओ पाहायला मिळतील. बिकिनीपासून शॉर्ट ड्रेसपर्यंत ती तिच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेते. सध्या दिशा तिच्या ड्रेसमुळे ट्रोलच्या निशाण्यावर आली आहे.
आपल्या मित्र-मैत्रिणींना भेटायला आलेल्या दिशाने शॉर्ट टॉप घातला होता आणि त्यामुळे ती गोंधळलेली दिसली. या शॉर्ट टॉपमध्ये ती मीडियाच्या कॅमेऱ्यात कैद झाली. अभिनेत्रीचा फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. काहींनी तर तिची तुलना उर्फी जावेद आणि पूनम पांडेशी केली.
दिशा पटानी आली ट्रोलर्सच्या निशाण्यावर
दिशा पटानीच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ती अतिशय शॉर्ट पांढऱ्या रंगाच्या टॉपमध्ये दिसली. ती या टॉपमध्ये खूप अस्वस्थ दिसली. तसे, दिशा तिच्या कपड्यांसाठी ट्रोल होण्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधीही तिला तिच्या ड्रेसिंग सेन्ससाठी सोशल मीडियावर अनेकदा ट्रोल केले गेले आहे. दिशाच्या नुकत्याच व्हायरल झालेल्या व्हिडिओ कमेंट करताना एका युजरने लिहिले की, “सेकंड उर्फी जावेद.” दुसरीकडे, आणखी एका युजरने कमेंट करत लिहिले की, “पूनम पांडेची स्टाईल कॉपी करत आहे.”
View this post on Instagram
दिशा पटानीचे चाहते तिच्या लेटेस्ट लूकवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. तिच्या या व्हिडिओवर कुणी फायर, तर कुणी हार्ट इमोजी पाठवत आहेत. दिशा नुकतीच ‘एक व्हिलन रिटर्न्स’ या चित्रपटात दिसली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. या चित्रपटात जॉन अब्राहम, अर्जुन कपूर आणि तारा सुतारिया देखील मुख्य भूमिकेत आहेत.
तिच्या चित्रपटाव्यतिरिक्त दिशा पटानी सध्या टायगर श्रॉफसोबतच्या ब्रेकअपच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. दिशा आणि टायगर दोघांनीही त्यांच्या ब्रेकअपबाबत कोणतेही सार्वजनिक वक्तव्य केलेले नाही.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
जगातला सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण! दिया मिर्झाच्या मुलाने पहिल्यांदा म्हटले ‘आई’, मलायकाही झाली खुश
प्रियांकाचा आतापर्यंतचा सगळ्यात बोल्ड व्हिडिओ होतोय व्हायरल, बाथरूममध्ये करत होती ‘हे’ काम
देशाचा अभिमान आहे रणवीर सिंगची मेहुणी, भल्याभल्या अभिनेत्रींनाही पछाडण्याचा राखते दम