Wednesday, July 3, 2024

ब्रेकिंग! प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक सतीश कौशिक काळाच्या पडद्याआड, बॉलिवूडवर शोककळा

बॉलिवूड मधून एक अत्यंत दुःखद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते, दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे निधन झाले आहे. आज (गुरुवार, 9 मार्च) रोजी पहाटेच्या सुमारास त्यांचे निधन झाले. अनुपम खेर यांनी ट्विट करुन त्यांच्या निधनाची माहिती दिली. सतीश कौशिक यांच्या आकस्मिक निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. ( Bollywood Actor Filmmaker Satish Kaushik Passed Away At Age Of 66 In Delhi Due To Heart Attack )

सतीश कौशिक हे बुधवारी गुडगाव येथील एका फार्महाऊसवर गेले होते, तिथून परतत असताना त्यांना कारमध्येच हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना तत्काळ गुडगावच्या फोर्टिस रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले. सतीश कौशिक यांचे पार्थिव सध्या दिल्लीतील फोर्टिस रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. शवविच्छेदनानंतर दुपारी त्यांचे पार्थिव मुंबईत आणले जाईल आणि त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

 

दिनांक 13 एप्रिल रोजी 1965 मध्ये हरियाणा इथे जन्मलेले सतीश कौशिक हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते, कॉमेडियन, स्क्रिप्ट रायटर, दिग्दर्शक तसेच निर्माता होते. त्यांनी अनेक नाटकांमध्ये देखील काम केले आहे. कौशिक यांना खरी ओळख मिळाली 1987 मध्ये आलेल्या मिस्टर इंडिया या चित्रपटातून. त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. त्यांना 1990 च्या रामलखन आणि 1997 च्या साजन चले ससुराल साठी सर्वश्रेष्ठ हास्य अभिनेतेसाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
– मसाबा गुप्ताने वडील व्हिव्हियन रिचर्ड्स यांना वाढदिवसानिमित दिल्या खास शुभेच्छा; म्हणाली पप्पा ‘तुम्ही चांगलं केलं…’
– PHOTO : सलमानची ऑनस्क्रीन भाची 24 वर्षांनंतर दिसतेय एकदम कडक, बघा किती बदललीये? ओळखणेही कठीण

हे देखील वाचा