Thursday, June 19, 2025
Home बॉलीवूड गाेविंदाच्या पत्नीच्या चुकीची शिक्षा मंदीर कर्मचाऱ्याना! ‘या’ गाेष्टीमुळे घडला वाद, लगेच वाचा

गाेविंदाच्या पत्नीच्या चुकीची शिक्षा मंदीर कर्मचाऱ्याना! ‘या’ गाेष्टीमुळे घडला वाद, लगेच वाचा

बॉलिवूडचा हिरो नंबर वन म्हणजेच गोविंदा याची पत्नी सुनीता आहुजा नुकतीच उज्जैनच्या महाकाल मंदिरात दर्शनासाठी पोहोचली होती. ज्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल हाेत आहे आहेत. मात्र, या फोटोंमध्ये सुनीता मंदिराच्या गर्भगृहात हँडबॅग घेऊन जाताना दिसली, ज्यामळू सध्या चांगलाच गदारोळ झाला आहे. खरे तर, पर्ससारख्या वस्तू मंदिरात नेण्यास सक्त मनाई आहे.

सुनीता आहुजा 15 मे रोजी उज्जैनच्या महाकाल मंदिरात पोहोचली. मात्र, यादरम्यान पूजा करत असताना तिच्या हातात पर्स दिसली, ज्याला मंदिराच्या आत नेण्यास मनाई आहे. आश्‍चर्याची बाब म्हणजे मंदिर समितीच्या एकाही सदस्याने सुनीताच्या या कृत्याकडे लक्ष दिले नाही. अशात मंदिराच्या सुरक्षेवरही अनेक प्रश्न उपस्थित होत असून या फोटोवरून सोशल मीडियावर चांगलाच गोंधळ सुरू आहे.

दुसरीकडे, ही बाब संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली असता, पर्स आत कशी नेण्यास परवानगी दिली, याचे फुटेज पाहूनच पुढील कारवाई केली जाईल, असे मंदिराच्या प्रशासकाने सांगितले.

महाकाल मंदिराचे प्रशासक संदीप सोनी यांनी याबाबत माहिती दिली की, त्यादरम्यान सुरक्षा दल गेटवर गुंतले होते आणि कोणीही बॅग किंवा पर्स आत घेऊन जाणार नाही याची काळजी घेणे ही त्यांची जबाबदारी होती. तसेच दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunita Ahuja (@sunita.ahuja.7583)

मंदिराला भेट दिल्यानंतर हे फाेटाे सुनीत आहुजाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहे. फाेटाेंमध्ये सुनीताने गुलाबी रंगाची साडी नेसली असून कपाळावर टिळकही लावले आहेत. हा फाेटाे शेअर करताना सुनीताने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘उज्जैनमध्ये महाकालाचे सुंदर दर्शन झाले..’ सुनीताच्या या फोटोंवर चाहतेही भरभरुण कमेंट करत आहेत.(bollywood actor govinda wife sunita ahuja trolled for carrying bag in sanctorum of ujjain mahakal temple)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
स्वतःचाच “त्या” सिनेमातील अभिनय पाहून दुखावलेल्या सतीश शाह यांनी ‘या’ कारणासाठी सोडले अभिनय क्षेत्र?
परी म्हणू की सुंदरा! कान्समध्ये साराच्या ड्रेसने वेधले सर्वांचे लक्ष, फाेटाे व्हायरल

हे देखील वाचा