Sunday, April 14, 2024

करण आणि द्रिशाच्या रिसेप्शनला धर्मेंद्र यांच्या जुन्या मित्रांनी लावली हजेरी, व्हिडिओ एकदा पाहाच

धर्मेंद्र यांचा नातू आणि सनी देओलचा मुलगा करण देओलने चित्रपट निर्माते बिमल रॉय यांची नात द्रिशा आचार्यसोबत लग्न केले आहे. या दोघांनी 18 जून रोजी मुंबईतील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये लग्नगाठ बांधली. अशात 18 जून रोजी याच हॉटेलमध्ये दोघांनी लग्नाची रिसेप्शन पार्टी ठेवली होती, ज्यामध्ये बॉलिवूडचे अनेक स्टार्स उपस्थित होते.

करण (karan deol) आणि द्रिशाच्या रिसेप्शनला धर्मेंद्र यांच्यासोबत काम केलेले जुने मित्रही उपस्थित होते. यादरम्यान 90च्या दशकातील अनेक प्रसिद्ध कलाकार पाहायला मिळाले. अशात लग्नाच्या रिसेप्शनचे अनेक फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यामध्ये शत्रुघ्न सिन्हा, प्रेम चोप्रा, जॅकी श्रॉफ, राज बब्बर, सुनील शेट्टी, आणि अनुपम खेर कॅमेऱ्यासमोर पोज देताना दिसत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

धर्मेंद्र यांचे मित्र पोहोचले करणच्या रिसेप्शनला
अभिनेता करण आणि द्रिशा त्यांच्या रिसेप्शनमध्ये खूपच स्मार्ट दिसत होते. यावेळी त्यांना लग्नाच्या शुभेच्छा आणि आशिवार्द देण्यासाठी धर्मेंद्र यांचा मित्र शत्रुघ्न सिन्हा पार्टीमध्ये उपस्थित हाेते, ज्याचे फाेटाे साेशल मीडिायवर व्हायरल हाेत असून चाहते त्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. यासाेबतच बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आणि धर्मेंद्र यांचे खास मित्र अनुपम खेर यांनीही करण आणि द्रिशाच्या रिसेप्शन पार्टिला हजेरी लावली होती. मात्र, यावेळी त्यांच्या एका हातात प्लास्टर दिसले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

याशिवाय सुनील शेट्टी, आमिर खान, सलमान खान, दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग, कपिल शर्मा, वत्सल सेठ आणि इशिता दत्ता यांसारखे कलाकारही करण-द्रिशाच्या रिसेप्शन पार्टीत सहभागी झाले होते.(bollywood actor karan deol wedding reception dharmendra friend shatrughan sinha anupam kher prem chopra raj babbar attented )

अधिक वाचा-
झोया अख्तरच्या ‘द आर्चीज’चा टिझर रिलीज, स्टारकिड्सच्या धमाल शैलीने जिंकली चाहत्यांची मने
‘जलेगी भी तेरी बाप की’, हनुमानाच्या तोंडून हा डायलॉग ऐकून थक्क झालेत सुनील लहरी; म्हणाले, ‘अत्यंत लज्जास्पद…’

हे देखील वाचा