Wednesday, February 11, 2026
Home बॉलीवूड व्हायरल व्हिडिओनंतर करणसिंग ग्रोवर नेटकऱ्यांच्या निशाण्यावर; म्हणाले, ‘तो बायकोच्या जिवावर जगतो…’

व्हायरल व्हिडिओनंतर करणसिंग ग्रोवर नेटकऱ्यांच्या निशाण्यावर; म्हणाले, ‘तो बायकोच्या जिवावर जगतो…’

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री बिपाशा बासू आणि करण सिंह ग्रोवर यांनी नुकतीच चाहत्यांना गूड-न्यूज दिली आहे. बिपाशा आणि करण यांच्या घरी लवकरच एक चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. ४३ वर्षीय अभिनेत्री बिपाशा बसूने लग्नाच्या ६ वर्षानंतर तिच्या पहिल्या प्रेग्नेंसीची घोषणा केली आहे. यावेळी बिपाशानं तिचं बेबी बंप फ्लॉन्ट करत काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. नुकताच अभिनेता करण सिंग ग्रोव्हरचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये करण हा एका फूड मॅलमधून बाहेर येताना दिसत आहे. त्यानंतर फोटोग्राफर्स हे करणचे फोटो काढतात. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, काही लहान गरीब मुलं करणकडे पैसे मागण्यासाठी येतात पण करण त्यांना पैसे देत नाही. करणचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

काही नेटकऱ्यांनी या व्हायरल व्हिडीओला कमेंट करुन करणला ट्रोल केले. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, ‘करण म्हणत असेल की माझ्याकडेच पैसे नाहीत. तुम्हाला कुठून देऊ.’ तर दुसऱ्यांनी म्हटले की, ‘तुम्ही त्यांना थोडेसे खाद्यपदार्थ दिले तर ते कमी होत नाही’, तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, ‘त्याच्याकडे पैसे नसतील, तो स्वतः बिपाशाच्या भरवशावर जगत आहे.’

बिपाशा बसू (Bipasha Basu)आणि करण सिंग ग्रोवरची (Karan Singh Grover) पहिली भेट एका चित्रपटाच्या सेटवर झाली. हे दोघे एकमेकांना काही वर्ष डेट करत होते. त्यानंतर २०१६ मध्ये दोघांनी लग्न केलं. आता लग्नानंतर सहा वर्षांनी करण आणि बिपाशा आई-बाबा होणार आहेत. धूम २, फिर हेरा फेरी,नो एन्ट्री, मेरे यार की शादी है या चित्रपटांमध्ये बिपाशानं काम केलं आहे. तर करण सिंग ग्रोवर ‘दिल मिल गए’ आणि ‘कुबूल है’ सारख्या अनेक टीव्ही मालिकांमध्ये दिसला आहे. काही काळापूर्वी तो ‘कसौटी जिंदगी की २’ या मालिकेत दिसला होता. तो श्री. ऋषभ बजाजच्या भूमिकेत दिसला होता. चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर तो ‘हेट स्टोरी ३’ आणि ‘अलोन’ मध्ये दिसला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

खुशी कपूरच्या बोल्ड अदा! पाहा फोटो गॅलरी

पत्रकारासमोरचं विजय देवरकोंडाने केले ‘असे’ कृत्य, नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप

शिल्पा शेट्टीच्या मुलांचा ‘राधाकृष्ण’ लूक पाहून तुम्हीही पडाल प्रेमात, व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

हे देखील वाचा