Monday, September 25, 2023

कार्तिकने जुहूमध्ये खरेदी केले आलिशान अपार्टमेंट, जाणून घ्या अभिनेत्याच्या नवीन घराची किंमत

अभिनेता कार्तिक आर्यन सर्वांनाच आवडतो, त्याने पडद्यावर आपल्या अभिनय कौशल्याची छाप साेडून लोकांना वेड लावले आहे. सध्या कार्तिक आर्यन त्याचा नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. कार्तिक-कियारा यांच्या चित्रपटाला लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे आणि कलाकार त्याच्या यशाचा खूप आनंद घेत आहेत. एकीकडे कार्तिक चित्रपटाच्या यशात रमतो आहे, तर दुसरीकडे अभिनेत्याने मुंबईत नवीन घर विकत घेतल्याची बातमी येत आहे. या नवीन घराची किंमत काराेडाेंमध्ये सांगितली जात आहे, पण अभिनेत्याने घर मुंबईत नेमके घेतले तरी कुठे? चला, जाणून घेऊया…

माध्यमातील वृत्तांनुसार, कार्तिक आर्यन (kartik aaryan ) याने जुहूमधील पाॅश भागात 17 कोटी 50 लाख रुपये किमतीचे एक आलिशान अपार्टमेंट खरेदी केले आहे. या मालमत्तेची बाजारातील किंमत 7.49 कोटी रुपये आहे, परंतु अभिनेत्याने ती 17.50 कोटी रुपयांच्या प्रीमियमवर खरेदी केली आहे. हे अपार्टमेंट एनएस रोड क्रमांक 7, जुहू स्कीम येथे असलेल्या सिद्धी विनायक बिल्डिंगच्या दुसऱ्या मजल्यावर आहे. कार्तिकचे हे नवीन घर 1,593.61 स्क्वेअर फूट क्षेत्रात आहे. हे परिसरातील सर्वात महाग प्रॉपर्टीपैकी एक आहे.

या इमारतीच्या आठव्या मजल्यावर कार्तिक आर्यनच्या कुटुंबाचे आधीच एक अपार्टमेंट आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, कार्तिकची आई डॉ. माला तिवारी यांनी अभिनेता शाहिद कपूरकडून महिन्याला 7.5 लाख रुपये भाड्याने घेतले होते. अशात कार्तिकने त्याच्या नावावर पॉवर ऑफ अॅटर्नी देऊन त्याची आई डॉ. माला तिवारी यांची मालकीण म्हणून नियुक्ती केली आहे.

जुन्या काळातील तसेच सध्याच्या पिढीतील बॉलिवूड सेलिब्रिटींची घर खरेदीसाठी जुहू ही पहिली पसंती आहे. अमिताभ बच्चन, अनिल कपूर, जितेंद्र, हेमा मालिनी, शत्रुघ्न सिन्हा, सोनाक्षी सिन्हा, झायेद खान, फरदीन खान या कलाकारांची घरेही येथे आहेत. कार्तिक आर्यनच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर त्याचा ‘सत्यप्रेम की कथा’ हा चित्रपट सध्या प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. यानंतर हा अभिनेता कबीर खान दिग्दर्शित ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटात काम करताना दिसणार आहे.(bollywood actor kartik aaryan buys 17 crore 50 lakh rupees luxury apartment in juhu mumbai)

अधिक वाचा-
श्रीदेवीच्या मृत्यूपूर्वी जान्हवीने आईला सांगितलेले ‘हे’ शेवटचे शब्द, वाचून तुमच्याही डोळ्यात येतील अश्रू

केवळ 13 वर्षांचे असताना गायनासाठी सोडले होते घर; तर असा होता कैलाश खेर यांचा संगीत क्षेत्रातील खडतर प्रवास

हे देखील वाचा