Wednesday, November 13, 2024
Home कॅलेंडर केवळ 13 वर्षांचे असताना गायनासाठी सोडले होते घर; तर असा होता कैलाश खेर यांचा संगीत क्षेत्रातील खडतर प्रवास

केवळ 13 वर्षांचे असताना गायनासाठी सोडले होते घर; तर असा होता कैलाश खेर यांचा संगीत क्षेत्रातील खडतर प्रवास

बॉलिवूडला एका पेक्षा एक सुपरहिट गाणी देणारे गायक म्हणजे कैलाश खेर. त्यांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या आवाजाने ते संगीत प्रेमिंच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. शुक्रवारी(7 जुलै) कैलाश खेर यांचा वाढदिवस आहे. 7 जुलै 1973 रोजी कैलाश खेर यांचा जन्म उत्तरप्रदेशमधील मेरठ येथे झाला होता. त्यांनी 10 पेक्षाशी जास्त भाषेत 700 पेक्षा अधिक गाणी गायली आहेत. त्यांचे वडील पंडित मेहर सिंग खेर हे एक पुजारी होते. ते नेहमीच कार्यक्रमात ट्रेडिशनल फोक गाणी गात असायचे. त्यांनी बॉलिवूडला एका पेक्षा एक अशी सुपरहिट गाणी दिली आहेत. चला तर जाणून घेऊया त्यांच्याबाबत अधिक माहिती.

कैलाश खेर यांनी लहान असताना त्यांच्या वडिलांकडून संगीताचे शिक्षण घेतले. संगीताची आवड निर्माण झाल्यानंतर, त्यांना कधीही बॉलिवूड गाणी ऐकायला आवडले नाही. संगीत शिकण्यासाठी त्यांनी त्यांचे राहते घर सोडले होते. ते केवळ 13 वर्षांचे असताना घरच्यांशी भांडून मेरठ येथून दिल्लीला आले होते. दिल्लीमध्ये संगीत शिकता शिकता पैसे कमावण्यासाठी त्यांनी तिथे आलेल्या परदेशी लोकांना संगीत शिकवण्यासाठी सुरुवात केली.

एकदा कैलाश खेर ऋषिकेशला आले होते. तिथे ते साधू संतांमध्ये राहून गाणी गाऊ लागले. तिथे त्यांना एक वेगळेच समाधान मिळाले आणि मग ते तेथून मुंबईला गेले. मुंबईला आल्यावर सुरुवातीचे दिवस त्यांच्यासाठी खडतर होते. त्यांनी अनेक वेळा स्टुडिओमध्ये चक्कर मारल्या पण काही काम नाही होऊ शकले. त्यानंतर एक दिवस राम संपत यांनी कैलास खेर यांना एका जाहिरातीचे जिंगल गाण्यासाठी बोलवले.

त्यानंतर त्यांना अक्षय कुमार आणि प्रियांका चोप्राच्या ‘अंदाज’ या चित्रपटात गाणे गाण्याची संधी मिळाली. ते गाणे होते ‘रब्बा इश्क ना होवे.’ त्यांचे हे गाणे खूप लोकप्रिय झाले होते. त्यांचे ‘बाहुबली’ चित्रपटातील गाणे देखील खूप प्रसिद्ध झाले होते.

त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये एका पेक्षा एक सुपरहिट गाणी गायली आहेत. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये ‘चांद सिफारिश’, ‘जय जयकारा’, ‘अल्लाह के बंदे’, ‘ए रब्बा’, ‘तेरी दीवानी’ यांसारखी अनेक गाणी गायली आहेत.(Kailas kher birthday special, know more information about his music journey)

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा