Friday, May 24, 2024

पहिला सिनेमा मिळवण्यासाठी कार्तिक आर्यनने पाहिली तीन वर्ष वाट, मोठ्या संघर्षाने मिळवले यश

बॉलिवूडमधील आजच्या पिढीचा आवडता अभिनेता म्हणजे कार्तिक आर्यन. चॉकलेटी हिरो म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या कार्तिकने अतिशय हलक्या फुलक्या चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. रोमान्स, कॉमेडी करणारा कार्तिक आता आगामी त्याच्या ‘शहजादा‘ सिनेमात दमदार ऍक्शन करताना दिसणार आहे. सध्या तो त्याच्या या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याच निमित्ताने तो टेलिव्हिजनवरील एका मोठ्या शोमध्ये पोहचला. तिथे त्याने त्याच्या आयुष्याशी संबंधित अनेक रहस्य उघड केली आहेत. शिवाय स्वतःच्या हिंमतीवर या इंडस्ट्रीमध्ये ओळख मिळवण्यासाठी त्याने जो संघर्ष केला त्याच्यावर त्याने भाष्य केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

कार्तिक आर्यनने मुलखतीमध्ये सांगितले की, त्याने त्याच्या आईवडिलांना देखील कधीच सांगितले नाही की, त्याला अभिनेता व्हायचे आहे. आई वडिलांना वाटायचे की मुलगा कॉलेजमध्ये जातो, अभयास करतोय मात्र तो सतत ऑडिशन देत होता. “हो माझ्या पालकांना कधीच माहित नव्हते की मी ऑडिशन द्यायचो. माझ्या कॉलेजमध्ये स्टुडंट्स पासून ते टीचर्सपर्यंत सर्वाना माहित होते की मी कॉलेज आणि अभ्यास याच्याशी माझा काही संबंध नाही.” याचंच त्याने एक किस्सा देखील सांगितला. तो म्हणाला, “एकदा मी माझी व्हायव्हा सोडून ऑडिशनला गेलो. जेव्हा मी परत आलो तेव्हा व्हायव्हा संपली होती, मी माझ्या टिचरला विनंती केली की, माझी व्हायव्हा घ्या तेव्हा त्या म्हणाल्या तू फक्त माझे नाव सांग मी तुला पास करेल. पण मला त्यांचे नाव देखील सांगता आले नाही.

कार्तिक आर्यनने त्याच्या संघर्षाच्या दिवसांबद्दल आणि पहिल्या सिनेमा मिळवण्याच्या धडपडीबाबत सांगितले. तो म्हणाला “पहिला सिनेमा मिळवण्यासाठी मला दोन तीन वर्ष लागले. मी फेसबुकवर ऑडिशन शोधायचो. मात्र कधीच योग्य सिनेमाचे ऑडिशन नाही मिळाले. दोन अडीच वर्ष यातच गेले. अशा प्रकारे मला माझा पहिला सिनेमा ‘प्यार का पंचनामा’ मिळाला. मी माझ्या मित्रांसोबतचा फोटो निर्मात्यांना पाठवला आणि लिहिले, मी तोच आहे ज्याचा तुम्ही शोध घेत आहात. त्यानंतर 6 महिने ऑडिशनमध्ये गेले आणि मला ‘प्यार का पंचनामा’ मिळाला. मात्र मला खरी ओळख ‘सोनू के टीटू की स्वीटी’ सिनेमाने मिळवून दिली.” कार्तिक त्याच्या आगामी शेहजादा सिनेमात कृती सेननसोबत दिसणार आहे.

अधिक वाचा –
वयाच्या 48व्या वर्षी शिल्पा शेट्टीचे टोन्ड अॅब्स पाहून चाहते थक्क, व्हिडिओ एकदा पाहाच
‘मला माझ्या मुलांना विशेष…’, सुनील शेट्टीला त्याच्या मुलांना भारतात का नाही शिकवावं वाटलं? अभिनेता म्हणाला…

हे देखील वाचा