Saturday, June 29, 2024

धक्कादायक! लाइव्ह शाेदरम्यान कार्तिक आर्यन जखमी, अभिनेत्याची अवस्था पाहून सर्वच थक्क

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन नुकताच त्याच्या ‘शहजादा’ चित्रपटामुळे चर्चेत होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. कार्तिक आणि क्रिती सेनॉनचा हा चित्रपट लोकांवर फारसा प्रभावित करू शकला नाही. दरम्यान, अभिनेता लाईव्ह परफॉर्मन्स दरम्यान जखमी झाल्याची बातमी ऐकायला मिळत आहे.

खरे तर, कार्तिक आर्यन (kartik aaryan) एका कार्यक्रमात परफॉर्म करत असताना त्याच्या पायाला दुखापत झाली आहे. या घटनेबाबत  सूत्राने सांगितले की, ‘कार्तिकने इतके दिवस गुपित ठेवले हे आश्चर्यकारक आहे. स्टेजवर त्याच्यासोबत जे काही घडलं, ती गोष्ट छोटी नव्हती. आम्ही सर्व खरोखर घाबरलो होतो.’ त्यांनी पुढे सांगितले की, ‘कार्यक्रमात अभिनेता ‘भूल भुलैया 2’ची सिग्नेचर स्टेप करत असताना त्याचा पाय मुरगळला..’

सूत्राने पुढे सांगितले की, ‘कार्तिक आर्यनच्या पायाला मुका मार बसल्याने ताे स्टेजवर पुन्हा येऊच शकला नाही. सुरुवातीला सर्वांना वाटले की, तो मस्करी करतोय, पण नंतर जेव्हा हे प्रकरण समजले तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटले. वैद्यकीय मदत येईपर्यंत कार्तिक 20-30 मिनिटे दुखापत अवस्थेत राहिला. वैद्यकीय तपासणीनंतर अभिनेत्याला तीव्र वेदनांपासून आराम मिळाला आहे, पण तरीदेखील अभिनेता पूर्णपणे ठिक झाला नाही. असे असले तरी कार्तिक कामावर परतला आहे.

कार्तिक आर्यनचा ‘शेहजादा’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या काही तासांत पायरसीचा बळी ठरला. फिल्मझिला, मूवीरुल्झ, टेलिग्राम, तमिलरॉकर्स यासारख्या इतर विविध टोरेंट साइट्सवर हा चित्रपट विनामूल्य HD डाउनलोडसाठी उपलब्ध आहे.(bollywood actor kartik aaryan injured during live show bhool bhulaiya 2 actor leg froze in mid air )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
शालीन भानाेतची एक्स पत्नी दुसऱ्यांदा अडकली विवाह बंधनात, फोटो व्हायरल
ऑस्कर सोहळ्यामध्ये ‘नाटू नाटू’ गाण्यावर रामचरणला करायचा होता डान्स, मात्र ‘या’ कारणामुळे इच्छा राहिली अपूर्ण

हे देखील वाचा