Thursday, March 28, 2024

ओम राऊत यांना नोटीस, रामायणाचे इस्लामीकरण करत असल्याचा ब्राह्मण महासभेचा आरोप, वाचा सविस्तर

लाेकप्रिय अभिनेता प्रभासच्या ‘आदिपुरुष‘ चित्रपटाच्या टीझरवरून सुरू असलेला वाद थांबण्याचे नावच घेत नाही आहे. आता या चित्रपटाबाबत ठिकठिकाणी विरोध सुरू झाला आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल झाल्यानंतर आता चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत यांना नोटीस पाठवून माफी मागण्यास सांगण्यात आली आहे. सर्व ब्राह्मण महासभेने गुरुवारी (दि. 6 ऑक्टाेबर)ला ही नोटीस पाठवली आहे. अधिवक्ता कमलेश शर्मा यांनी पाठवलेल्या नोटीसमध्ये सर्व ब्राह्मण महासभेच्या वतीने सात दिवसांत चित्रपटातील वादग्रस्त दृश्ये हटवा अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे, असे म्हटले आहे.

सर्व ब्राह्मण महासभेच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी पाठवलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, “चित्रपटात हिंदू देवतांचे चित्रण चुकीच्या पद्धतीने करण्यात आले आहे. यात चामड्याचे कपडे घातलेल्या हिंदू देवदेवतांचे चित्रण केले आहे आणि अपमानास्पद रीतीने बोलताना देखील दाखवले आहे.” खरं, तर चित्रपटात अत्यंत खालच्या पातळीची भाषा वापरली गेली आहे, जी धार्मिक भावना भडकावणारी आणि दुखावणारी आहे. चित्रपटात धार्मिक आणि जातीय द्वेष पसरवणारे संवाद आणि चित्रण केले आहे. रामायण हा आपला इतिहास आणि आपला आत्मा आहे, तर आदिपुरुष चित्रपटात भगवान हनुमानाला मुघल म्हणून चित्रित केले आहे.

नाेटिसमध्ये पुढे लिहिले आहे की, “कोणत्या हिंदूला मिशीशिवाय दाढी आहे जी भगवान हनुमानजींना दाखवली जात आहे. त्याचबरोबर या चित्रपटात भगवान राम, माता सीता, भगवान हनुमान यांचे पूर्णपणे इस्लामीकरण करण्यात आल्याचेही या चित्रपटात सांगण्यात आले आहे. आदिपुरुष या चित्रपटात रावणाची भूमिका साकारणारा सैफ अली खान(Saif Ali Khan) हा तैमूर आणि खिलजीसारखा दिसत आहे. हा चित्रपट देशातील धार्मिक भावना भडकावून एका विशिष्ट वर्गामध्ये द्वेष पसरवणार आहे. हे चित्र इंटरनेटच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध केले जात आहे, जे आपल्या समाजासाठी आणि देशासाठी पूर्णपणे हानिकारक आहे. तुम्ही करोडो हिंदूंच्या भावना दुखावणारा चित्रपट बनवत आहात.”

‘आदिपुरुष’मध्ये प्रभास(Prabhas) शिवाय क्रिती सेनॉन(Kriti Sanon) सीता बनली आहे, तर सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार यांनी केली असून दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सोनालीच्या मोनोक्रोम फोटोंचा राडा, पाहा मराठमोळ्या वेशभूषेतील फोटो

मुलीच्या वयाच्या तरुणीसोबत व्यक्तीने लावले जोरदार ठुमके, व्हिडिओ पाहून तोंडात घालाल बोटे

हे देखील वाचा