Monday, June 24, 2024

कार्तिक आर्यनच्या ब्रँड व्हॅल्यूला बसला मोठा धक्का, ‘शहजादा’चे कलेक्शन ठरले कारण?

नुकताच कार्तिक आर्यनचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित असा ‘शहजादा’ सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमाकडून कार्तिकला आणि बॉक्स ऑफिसला बऱ्याच अपेक्षा होत्या. हा सिनेमा तुफान गाजून पठाणला टक्कर देईल असे देखील सांगण्यात येत होते. मात्र प्रत्यक्षात असे काहीच झाले नाही. २०२२ साली आलेल्या कार्तिक आर्यनच्या ‘भूल भुलैया 2’ सिनेमातून त्याने जे काही कमावले ते सर्वच त्याने शहजादा सिनेमात घालवल्याचे चित्र दिसत आहे. शहजादा फ्लॉप झाल्यानंतर आता पुन्हा एकदा कार्तिकचे करियर तिथेच आले आहे, जिथे ‘भूल भुलैया 2’ प्रदर्शित होण्याआधी होते. ‘भूल भुलैया 2’ हिट होण्यामागे कार्तिकने श्रेय स्वतःलाच देत इतर कलाकरांना बाजूला सारण्याचा प्रयत्न केला होता. तो सिनेमा हिट होण्यामागे तब्बूचा मोठा वाटा होता. मात्र त्याने तिला देखील श्रेय दिले नव्हते. आता शहजादा फ्लॉप झाल्याचे कारण देखील प्रेक्षक कार्तिकलाच देत आहे.

शहजादा हा सिनेमा तयार होण्यासाठी ८५ कोटी खर्च आला. या सान्म्त कार्तिक आर्यनने कोणतीही फी न घेता निर्माता म्हणून काम केले. मात्र प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी, सिनेमात बजेटच्या १० टक्के इतके देखील कमवले नाही. सिनेमाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी ६ कोटी, दुसऱ्या दिवशी ६.६५ कोटी, तिसऱ्या दिवशी ७.३० कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले. याप्रकारे सिनेमाने पहिल्या आठवड्याच्या शेवटी २० कोटींची कमाई केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

कार्तिक आर्यनच्या शहजादा सिनेमाला नुकसान कदाचित चुकीच्या प्रचारामुळे झाले असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. कार्तिकचा बहुचर्चित ताजमहल दौरा तीन वेळा ठरला आणि तीन वेळा रद्द झाला. चौथ्यांदा कार्तिक तिथे प्रमोशनल पोहचला. यामागे टी सिरीज आणि कार्तिक आर्यनमध्ये एका गाण्याला घेऊन झालेला गोंधळ सांगितलं जात आहे. शिवाय सिनेमाचा प्रचार करणाऱ्या मार्केटिंगला टीमला हेच ठरवता आले नाही की, सिनेमा कार्तिक आर्यनचा पहिला ऍक्शनपट आहे, रोमॅंटिक कॉमेडी आहे की कौटुंबिक सिनेमा आहे.

या आणि इतर अनेक कारणांमुळे शहजादा फ्लॉप झाल्याचे सांगितले जाते. या सिनेमाचे कलेक्शन कार्तिकच्या सुपरफ्लॉप ‘लव आज कल’ पेक्षा खाली गेले आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मोठी बातमी : कन्नड चित्रपट दिग्दर्शक एसके भगवान यांना देवाज्ञा
जेव्हा अन्नू कपूर यांच्यासोबत इंटिमेट सीन द्यायला प्रियांका चोप्राने दिला नकार, पाहा काय म्हणाला अभिनेता

हे देखील वाचा