आपल्या सर्वांच्या आयुष्यात प्रत्येक नाते महत्त्वाचे असते. कोणाचीही जागा कोणीही घेऊ शकत नाही. विशेषतः आजी-आजोबा जे आपले लाड करतात, ते प्रेम इतर कोणाकडूनही मिळत नाही. अशा परिस्थितीत, त्यांच्यापैकी कोणालाही गमावणे किती वेदनादायी असू शकते, हे आपणा सर्वांना चांगलेच समजू शकते. बॉलिवूड अभिनेता कुणाल खेमूही (Kunal Kemmu) याच दुःखातून जात आहे. आज त्याने आपली लाडकी आजी कायमची गमावली.
कुणालने आपल्या आजीच्या निधनाची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. त्याने आजीसोबतचा स्वतःचा आणि मुलगी इनायाचा फोटो शेअर करत, एक अतिशय भावनिक पोस्ट लिहिली आहे. त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “आज मी माझी आजी गमावली. आम्ही तिला ‘मांजी’ म्हणायचो. आम्हा सर्वांच्या आयुष्यात तिने खऱ्या अर्थाने हे नाव कमावले. तिने आम्हा सर्वांवर आईसारखे प्रेम केले आणि जेव्हाही आम्ही तिच्यासोबत होतो, तेव्हा आम्हाला आनंदी आणि आरामदायक वाटण्यासाठी तिने खूप कष्ट केले.” (bollywood actor kunal khemu naani passed away)
कुणाल खेमूने आजीबद्दल पुढे लिहिले आहे की, “तिच्या गोष्टी सांगणे, मला खायला घालणे आणि माझी काळजी घेणे याच्याशी संबंधित माझ्या अनेक खास आणि अद्भुत आठवणी आहेत. ती माझ्यासाठी त्या वस्तू खरेदी करत असे, ज्यांना माझे आई-वडील परवानगी देत नव्हते. तिने नेहमी मला स्वतःवर विश्वास ठेवायला सांगितला.”
कुणाल खेमूने आपल्या आजीला ‘माझी सर्वात मोठी चीअरलीडर ऑलवेज’ असे संबोधले. अभिनेत्याने सांगितले की त्याची आजी आयुष्यातील प्रत्येक क्षण पूर्णतः जगली. ती त्यांच्यासाठी शक्ती, करुणा आणि प्रेमाचे प्रतीक आहे. कुणालने पुढे लिहिले की, त्याने आजीला कधीही रडताना पाहिले नाही. ती नेहमी स्वतःला कोणत्या ना कोणत्या कामात व्यस्त ठेवायची.
त्याच्या या लांबलचक पोस्टमध्ये कुणाल खेमू त्याच्या आजीबद्दल खूप भावूक दिसत होता. त्याच्या आयुष्यात आजीचे महत्त्व काय होते, हे त्याच्या या पोस्टवरून नीट समजू शकते. कुणालने लिहिले की, तो नेहमी त्याच्या ‘मांजी’ला मिस करेल.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा