धर्माचे अंतर पार करत, सोहा अन् कुणालने शर्मिला यांच्यासोबत साजरा केला ख्रिसमस; पाहा फोटो


बॉलिवूड अभिनेत्री सोहा अली खान (Soha Ali Khan), कुणाल खेमू (Kunal Khemu) आणि इनाया यांनी पतौडी पॅलेसमध्ये शर्मिला टागोरसोबत (Sharmila Tagore) ख्रिसमस साजरा केला. सोहा अली खानने तिच्या इंस्टाग्रामवर ख्रिसमसच्या सेलिब्रेशनचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये, सोहा अली खान, कुणाल आणि इनाया यांनी ख्रिसमसच्या थीमशी जुळणारे कपडे घातले आहेत. तसेच प्रत्येकाने ख्रिसमस ट्रीसोबत पोझ दिली आहे.

यातील एका फोटोमध्ये सोहा, कुणाल आणि इनायासोबत शर्मिला टागोरही दिसत आहेत. हे फोटो शेअर करत सोहा अली खानने कॅप्शनमध्ये लिहिले की, “आम्ही तुम्हाला ख्रिसमसच्या शुभेच्छा देतो.” यासोबतच सोहाने या फोटोंमध्ये पती कुणाल खेमूलाही टॅग केले आहे. पहिल्या फोटोमध्ये सोहा अली खान, तिचा पती कुणाल आणि मुलगी इनाया ख्रिसमस साजरा करताना दिसत आहेत. दुसऱ्या फोटोमध्ये शर्मिला टागोर सोहा, कुणाल आणि इनायासोबत सेलिब्रेशन करताना दिसत आहेत. या फोटोंना आतापर्यंत २१ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले असून, यावर उत्स्फूर्त प्रतिक्रियाही येत आहेत. (soha kunal inaaya sharmila spend christmas at pataudi palace see pics)

विशेष म्हणजे शर्मिला टागोर दोन वर्षांपासून पतौडी पॅलेसमध्ये आहेत. या काळात सोहा आणि इनायाने अनेकदा त्यांना भेट दिली. गेल्या महिन्यात शर्मिला यांनी करीना कपूर, सैफ अली खान आणि त्यांची मुले तैमूर आणि जेह यांच्यासोबत वेळ घालवला. त्याचबरोबर कुणाल खेमूनेही ख्रिसमसचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

इतकेच नव्हे, तर सोहाने कुटुंबासोबत दिवाळीचा सणही मोठ्या उत्साहात साजरा केला होता. तिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर दिवाळी सेलिब्रेशनचे काही फोटो शेअर केले होते. ज्यामध्ये ती तिचा पती कुणाल आणि मुलगी इनायासोबत पूजा करताना दिसली. पहिल्या फोटोत सोहा, कुणाल आणि इनाया मंदिरासमोर डोके टेकवून बसलेले दिसले. दुसरा फोटो सोहाचा असून, त्यात ती खाली बसून पोझ देताना दिसली. तर शेवटचा फोटो गोड इनायाचा होता.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!