Wednesday, December 6, 2023

‘या’ जाहिरातीमुळे मिलिंद चांगलाच अडकला; ट्राेलर्स म्हणाले, ‘मुलगा भांडी धुतो…’

बॉलिवूड अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमण आपल्या फिटनेसमुळे नेहमीच चर्चेत असतो. वाढत्या वयानुसार तो अधिक तंदुरुस्त होत आहे. त्याच्या वयाचा प्रभाव त्याच्या चेहऱ्यावर अजून दिसत नाही. वयाच्या या टप्प्यावरही त्याचा फिटनेस अप्रतिम आहे, ज्याद्वारे तो लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करत आहे.

अभिनेता मिलिंद (milind soman) कामासोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असताे. मिलिंद त्याच्या लग्नापासून ते नग्न होण्यापर्यंत अनेक कारणांमुळे चर्चेत राहतो. मिलिंद सोमण जे काही करताे ते नेहमी काहीतरी आऊट ऑफ द बॉक्स असतं. या दिवसात त्याने पुन्हा असेच काही केले आहे. अलीकडेच, त्याने डिश वॉशिंग लिक्विडची जाहिरात केली आहे, ज्याचा व्हिडिओ त्याने त्याच्या इन्स्टा अकाउंटवर शेअर केला आहे. मात्र, मिलिंदची ही जाहिरात युजर्सना अजिबात आवडलेली नाही. चाहते त्यांला जोरदार ट्रोल करत आहेत.

व्हिडीओमध्ये असे दाखवण्यात आले आहे की, मोठं बोलण्याऐवजी पुरुषांनी घरातील कामेही करावीत. पाहिले तर या व्हिडीओमध्ये फक्त जेंडर स्टिरिओटाइप नाही तर काळा रंगही पुरुषांशी जोडला गेला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की एक मुलगा जिममध्ये सांगतो की, “तो त्याच्या आईला घरी भांडी धुण्यास मदत करतो. यावर मिलिंद म्हणतो, ‘व्वा, आश्चर्यकारक आहे, कशाप्रकारे स्वत:चे कौतुक केले जातं आहे. आता येथे विम ब्लॅक आहे, ज्याने भांडी धुवा आणि स्वतःची प्रशंसा करा.” मिलिंद सोमण यांनी घेतलेले डिश वॉशिंग लिक्विड पिवळे किंवा हिरवे रंगाचे नसून ते काळ्या रंगाचे आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Milind Usha Soman (@milindrunning)

आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये मिलिंदने लिहिले की, “हे चुकीचे आहे, कामाला लिंग दिले आहे. म्हणजे काळे म्हंटले तर पुरुषार्थ होतो. तू काय केलेस.” या व्हिडिओवर कमेंट करत एका युजरने लिहिले की, “ज्यावेळी एखादा मुलगा भांडी धुतो आणि एखादी मुलगी त्याच्याकडे आकर्षित होते तेव्हा जाहिरात चांगली झाली असती.” आणखी एका यूजरने लिहिले की, “मिलिंदला आणखी चांगल्या जाहिराती मिळू शकतात.”

मिलिंद साेमण यांच्या अभिनय काराकिर्दी विषयी बाेलायचे झाले, तर त्याने ‘अशोका’, ‘प्यार का सुपर-हिट फार्मूला’ यासारख्या दमादर चित्रपटात काम केले आहे. (bollywood actor milind soman promotes dishwashing gel trolls user says choose better ads)

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
प्रत्येक रहस्य कधी ना कधीतरी उलगडतंच, पण आशय अन् साेनालीच्या ‘व्हिक्टोरिया’चे रहस्य उलगडणार का?

‘तू सेफ्टी पिन लावली असती…’, उर्फीचा पदर पडताच विस्फारले चाहत्यांचे डाेळे, केल्या भन्नाट कमेंट

हे देखील वाचा