सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद आजकाल सतत गोंधळ घालताना दिसत आहे. उर्फी नेहमीच तिच्या ड्रेसिंग सेन्सने चाहत्यांना आश्चर्यचकित करते. तिच्या नवीन लूकचे फोटो आणि व्हिडिओ दररोज सोशल मीडियावर व्हायरल होतात. या दरम्यान, आता उर्फीचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामुळे अभिनेत्री चांगलीच ट्राेल हाेत आहे.
अभिनेत्री उर्फी जावेद (urfi javed) हिचा नवीन व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये ती एअरपोर्टवर दिसत आहे. फिकट गुलाबी आणि केशरी रंगाची साडी आणि अतिशय बोल्ड ब्लाउज परिधान करून उर्फी विमानतळावर आल्याचे व्हिडिओमध्ये दिसते. तिथे ती पॅपराझींना पिझ्झा देताना दिसत आहे. पोज देण्यासाठी ती पुढे सरकताच तिचा पदर घसरला. हे एकदा नाही तर अनेक वेळा घडते. व्हिडीओ पाहून स्पष्टपणे कळते की, उर्फीला तिची साडी सांभाळण्यात खूप अडचणी येत आहेत. दुसरीकडे, जेव्हा उर्फीला तिची साडी सांभाळता येत नाही, तेव्हा तिला तिच्यासोबत असलेल्या महिलेने मदत केली.
View this post on Instagram
उर्फी जावेद क्वचितच कम्प्लिट आणि सिंपल लूकमध्ये दिसते. अशा परिस्थितीत उर्फीला साडीत पाहून चाहते थक्क झाले. उर्फीच्या साडी अवतारावर चाहते सतत प्रतिक्रिया देत आहेत. अनेक यूजर्स तिची स्तुती करताना दिसत आहेत, तर अनेक जण तिला टोमणे मारताना दिसत आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिले की, “अरे भाऊ, पूर्ण कपडे घातले आज, सर्व काही ठीक आहे, ना?” तर दुसऱ्या युजरने लिहिले की, “पोलीसवाली हसत आहे.” एका युजरने कमेंट करत चक्क लिहिले की, “हा चमत्कार कसा झाला?” तर एकाने पडलेला पदर पाहून “तुम्ही सेफ्टी पिन लावली असती’ असा सल्ला दिला आहे.
उर्फीच्या या व्हायरल व्हिडिओवर चाहते आणि ट्राेलर्स भन्नाट कमेंट करताना दिसत आहे. (bigg boss ott contestants urfi javed oops moment capture in camera video goes viral on social media)
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
श्रीलंकन सुंदरीच्या सौंदर्यावर नेटकरी फिदा, पाहा जॅकलीनचे बोल्ड फोटो
अशाेक कुमारांच्या लोकप्रियतेमुळे चाहत्यांच्या गर्दीवर पाेलिसांना करावा लागायचा लाठीचार्ज