कंगना राणौतचा पहिला प्रोडक्शन चित्रपट ‘टिकू वेड्स शेरू‘ रिलीजसाठी सज्ज आहे. मात्र, या चित्रपटातील नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अवनीत कौर यांच्या किसिंग सीनवरून गदारोळ सुरू झाला आहे. खरं तर, अवनीत कौर आणि अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्या वयात 28 वर्षांचे अंतर आहे आणि अशा परिस्थितीत चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दोघांचे लिप-लॉकिंग पाहून प्रेक्षक खूपच निराश झाले आहेत आणि आता ते याला विरोधही करत आहेत.
खरं तर, गेल्या वर्षी जेव्हा ‘टिकू वेड्स शेरू’ चित्रपटासाठी अवनीत काैर आणि नवाजुद्दीनच्या जोडीची घोषणा झाली, तेव्हापासून लोकांनी त्यावर टीका करण्यास सुरुवात केली. या सगळ्या टीकेवर आता नवाजुद्दीन सिद्दीकीची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्याने शाहरुखचे उदाहरण देत त्याच्या आणि अवनीतच्या किसिंग सीनवर खुलासा केला आहे.
माध्यमाशी बोलताना नवाजुद्दीनने अवनीतसोबतच्या नात्याबद्दल स्पष्टीकरण दिले आणि विचारले की, यात काही अडचण का आहे? तो म्हणाला, “रोमान्सचं वय नसतं, समस्या ही आहे की, तरुणांमध्ये रोमान्स उरला नाही… आम्ही त्या काळापासून आहोत जेव्हा रोमान्स काही औरच होता… आम्ही प्रेमात राहू आणि वर्षानुवर्षे ‘इश्क’मध्ये जगू.”
View this post on Instagram
नवाजुद्दीन पुढे म्हणाला, “आजही शाहरुख खान रोमँटिक भूमिका करत आहे. कारण, तरुण पिढी ‘नल्ली’ (निरुपयोगी) आहे… त्यांना रोमान्स माहित नाही.. ‘आज सर्व काही व्हॉट्सअॅपवर होते, मग ते प्रेम असो किंवा ब्रेकअप’.. याचे कारण असे की, जे लोक रोमान्समध्ये जगले आहेत तेच रोमान्स करू शकतात…. दुसरे कोण करणार?”
अवनीत कौर कंगना राणौतच्या मणिकर्णिका फिल्म्सच्या बॅनरखाली बनलेल्या ‘टिकू वेड्स शेरू’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात ती नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘टिकू वेड्स शेरू’ 23 जून 2023 रोजी अॅमेझाॅन प्राईमवर रिलीज होणार आहे.(bollywood actor nawazuddin siddiqui clarification on kissing scene with avaneet kaur in tiku weds sheru)
अधिक वाचा-
प्रसिद्ध कोरिओग्राफरचे निधन, वयाच्या 53व्या वर्षी ‘या’ गंभीर आजाराचे झाले शिकार
माेठी बातमी! रश्मिका मंदानासोबत मॅनेजरने केली 80 लाखांची फसवणूक; अभिनेत्रीने केली ‘ही’ कारवाई