Monday, April 15, 2024

प्रसिद्ध कोरिओग्राफरचे निधन, वयाच्या 53व्या वर्षी ‘या’ गंभीर आजाराचे झाले शिकार

प्रसिद्ध तेलुगू कोरिओग्राफर राकेश मास्टर यांचे रविवारी (18 जुन)ला वयाच्या 53व्या वर्षी निधन झाले. राकेश मास्टर यांच्या निधनाच्या बातमीने साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे. कोरिओग्राफरच्या निधनावर सर्व सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी शोक व्यक्त केला आहे.

माध्यमातील वृत्तानुसार, तेलुगू फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व राकेश, विशाखापट्टणममध्ये आऊटडोअर शूटिंग करून एका आठवड्यापूर्वी हैदराबादला परतले आणि आजारी पडले. अशात त्यांची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांना हैदराबादच्या गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांचे सर्व प्रयत्न करूनही त्यांना वाचवता आले नाही आणि रविवारी (18 जुन)ला संध्याकाळी राकेश यांनी अखेरचा श्वास घेतला. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, राकेश यांच्या अनेक अवयवांनी काम करणे बंद केले होते. त्यांना मधुमेहाचाही त्रास होता आणि ते गंभीर मेटाबॉलिक एसिडोसिस त्रस्त होते. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.

दिवंगत कोरिओग्राफर राकेश मास्टर यांनी ‘आटा’ अॅन्ड ‘घी’ सारख्या डान्स रिअॅलिटी शोमधून करिअरची सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. त्यांनी सुमारे 1,500 चित्रपटांसाठी कोरिओग्राफर म्हणून काम केले आणि अनेक हिट गाणी दिली.

तिरुपती येथे जन्मलेल्या राकेश यांचे खरे नाव एस. रामाराव होते डान्स मास्टर म्हणून कारकीर्द सुरू करण्यापूर्वी त्यांनी काही काळ हैदराबादमध्ये मास्टर मुक्कू राजू यांच्या हाताखाली काम केले. त्यांनी व्यंकटेश, नागार्जुन, महेश बाबू, राम पोथीनेनी आणि प्रभास यांसारख्या अनेक आघाडीच्या अभिनेत्यांसोबत काम केले आहे. टॉप टॉलिवूड कोरिओग्राफर शेखर मास्टर हे देखील राकेश मास्तर यांचे शिष्य आहेत. (choreographer rakesh master passes away at the age of 53)

अधिक वाचा-
‘जलेगी भी तेरी बाप की’, हनुमानाच्या तोंडून हा डायलॉग ऐकून थक्क झालेत सुनील लहरी; म्हणाले, ‘अत्यंत लज्जास्पद…’
‘दीपवीर’ने करण देओल अन् द्रिशा आचार्यच्या रिसेप्शनमध्ये लावले जाेरदार ठुमके, व्हिडिओ एकदा पाहाच

हे देखील वाचा