Monday, April 15, 2024

माेठी बातमी! रश्मिका मंदानासोबत मॅनेजरने केली 80 लाखांची फसवणूक; अभिनेत्रीने केली ‘ही’ कारवाई

अभिनेत्री रश्मिका मंदाना हिची 80 लाखांची फसवणूक झाली आहे. माध्यमातील वृत्तानुसार, अभिनेत्रीच्या मॅनेजरने तिच्यासाेबत ही फसवणूक केली आहे, ज्यानंतर रश्मिकाने तिच्या मॅनेजरला काढून टाकले आहे. हा मॅनेजर रश्मिकासोबत बराच काळ काम करत होता. मात्र, याबाबत रश्मिकान काेणतेही अधिकृत वक्तव्य जारी केलेले नाही.

माध्यमातील वृत्तानुसार, “रश्मिकाच्या मॅनेजरने तिची 80 लाख रुपयांची फसवणूक केल्याचे वृत्त आहे. मात्र, यासर्व गाेष्टीचं अभिनेत्रीला प्रदर्शन करायचं नाही. म्हणून याप्रकरणी तिने स्वतःहून कारवाई करत मॅनेजरला कामावरून काढून टाकले आहे.

रश्मिका शेवटची स्पाय थ्रिलर ‘मिशन मजनू’ या चित्रपटात दिसली हाेती. अशात आता ती रणबीर कपूरसोबत ‘अॅनिमल’ चित्रपटात दिसणार आहे. याचे दिग्दर्शन संदीप रेड्डी वंगा यांनी केले आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अनिल कपूर आणि बॉबी देओलही दिसणार आहेत. अशात हा चित्रपट 11 ऑगस्टला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

रश्मिकाच्या वर्क फ्रंटबद्दल बाेलायचे झाले, तर रश्मिका सध्या अल्लू अर्जुनसोबत ‘पुष्पा 2’चे शूटिंग करत आहे. या चित्रपटात ती श्रीवल्लीच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुकुमार करत आहेत. ‘पुष्पा 2’ च्या घोषणेनंतर, एका चाहत्याने ट्विटरवर लिहिले की, ‘मला आशा आहे की, पुष्पा 2 मधील श्रीवल्लीचे पात्र पहिल्या भागापेक्षा अधिक मजबूत असेल.’ अशात रश्मिकानेही यावर कमेंट केली होती की,”तिलाही तेच हवे आहे.”

‘पुष्पा’चे मूळ शूटिंग तेलुगू भाषेत झाले होते, पण ते हिंदी, तमिळ, मल्याळम आणि कन्नडमध्ये डब करण्यात आले होते. पाच भाषांमध्ये प्रदर्शित झालेला अल्लू अर्जुनचा हा पहिलाच चित्रपट होता. (tollywood actress rashmika mandanna reportedly gets cheated 80 lakh by her manager )

अधिक वाचा-
‘जलेगी भी तेरी बाप की’, हनुमानाच्या तोंडून हा डायलॉग ऐकून थक्क झालेत सुनील लहरी; म्हणाले, ‘अत्यंत लज्जास्पद…’
प्रसिद्ध कोरिओग्राफरचे निधन, वयाच्या 53व्या वर्षी ‘या’ गंभीर आजाराचे झाले शिकार

हे देखील वाचा