Monday, June 17, 2024

भांडणानंतर नवाजुद्दीनने केले असे काम की, पत्नी आलियाने मानले अभिनेत्याचे आभार

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. अभिनेत्याचे पत्नी आलियासोबत कोर्टात भांडण सुरू आहे. दरम्यान, आलिया सिद्दीकीने पती नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या अलीकडच्या प्रोडक्शन चित्रपट ‘होली काऊ’मध्ये काम केल्याबद्दल आभार मानले आहेत. मात्र, आलियाची ही प्रतिक्रिया लोकांना पचनी पडली नाही. नेमके आहे प्रकरण? चला जाणून घेऊया…

अलीकडेच आलियाने एका मुलाखतीत सांगितले की, “चित्रपटात पोलिसाची भूमिका साकारण्यासाठी आम्हाला नवाजची गरज होती आणि त्याला हे चांगलेच ठाऊक होते. त्यांनी आम्हाला त्याचा वेळ दिला आणि चित्रपटात मला स्थान देखील मिळवून दिले. चित्रपटाशी संबंधित प्रत्येक निर्णय दिग्दर्शकाने घेतला होता आणि मला चित्रपटाची कल्पना आवडली. आम्ही दोघांनीही आमचा अभिनय समजून घेतला आणि तो चांगला केला.”

नवाजुद्दीन मुख्य भूमिकेत का नाही असे विचारले असता आलिया म्हणाली, “चित्रपटाला स्टार चेहऱ्याची गरज नव्हती. या चित्रपटासाठी काही चांगल्या कलाकारांच्या दमदार अभिनयाची गरज होती. संजय मिश्रा जी यांनी अविश्वसनीय काम केले आहे. मुकेश भट्ट, सादिया सिद्दीकी आणि तिग्मांशू धुलिया यांनी या चित्रपटात पुर्ण जीव ओतला आहे. प्रत्येक चित्रपट निर्मात्याला त्याच्या चित्रपटात एक स्टार हवा असतो, यासाेबतच चित्रपटाला चांगल्या अभिनयाची गरज देखील असते.

नवाजुद्दीनने पत्नी आलियावर केला मानहानीचा खटला
आलिया आणि नवाजुद्दीनमध्ये अनेक दिवसांपासून चांगलेच भांडण सुरू आहे. नवाजुद्दीनने गेल्या महिन्यात आलियाविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला होता आणि तिच्याकडून माफी मागण्यासाठी 100 कोटी रुपयांची भरपाईही मागितली होती. यावर आलियाने अलीकडेच सांगितले की, ‘ते लवकरच घटस्फोट घेणार आहेत आणि ती त्यांच्या मुलांच्या कस्टडीसाठी लढणार देखील आहे.’ (bollywood actor nawazuddin siddiqui estranged wife aaliya expresses gratitude as he features in her film holy cow)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
कॅलिफाेर्नियात सुट्टयांचा आनंद घेताना मृण्मयी देशपांडे, फाेटाे व्हायरल

अजयची लेक न्यासा देवगणचा वाढदिवस साजरा करतानाचा ‘ताे’ व्हिडिओ व्हायरल, एकदा पाहाच

हे देखील वाचा