Saturday, June 15, 2024

पत्नी आणि मोलकरीणच्या गंभीर आरोपांनंतर पहिल्यांदाच बोलला नवाजुद्दीन; म्हणाला, ‘हे माझे एकमेव…’

नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याची पत्नी आलिया सिद्दीकी यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. अभिनेत्याच्या पत्नीने त्याच्यावर अनेक आरोप केले आहेत. अभिनेत्याच्या पत्नीने सांगितले होते की, तिला नजरकैदेत ठेवण्यात आले होते आणि मूलभूत गरजाही पुरवल्या जात नव्हत्या, ज्याचा व्हिडिओही आलियाने स्वत:ह तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. यानंतर अभिनेत्याच्या दुबईतील घरात राहणाऱ्या माेलकरीणेही अभिनेत्यावर आरोप केले हाेते. मात्र, नंतर तिने तिचे आपले आरोप मागे घेत त्याला क्लीन चिट दिली. या सर्व वादाच्या पार्श्‍वभूमीवर नवाजुद्दीन सिद्दीकीने पहिल्यांदाच या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

झालेल्या प्रकरणाविषयी जेव्हा नवाजुद्दीन सिद्दीकी (nawazuddin siddiqui) याच्याशी संवाद साधला गेला तेव्हा अभिनेत्याने उत्तर दिले की, “मला याबद्दल काहीही बोलायचे नाही… हो दरम्यानच्या काळात माझ्या मुलांच्या शालेय शिक्षणावर परिणाम होत आहे… माझी मुले दुबईत शिकतात आणि ते एक महिन्यापासून इथे आहेत. माझे एकच आवाहन आहे की, माझ्या मुलांनी शाळेत जावे, एवढेच मला वाटते. याव्यतिरिक्त मला काहीही बाेलायचे नाही.”

नवाजुद्दीन सिद्दीकीच्या पत्नीने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये आलियाने सांगितले होते की, “तिला घरात कैद केले आहे, बाहेर जाऊ दिले जात नाही.” आलिया आणि नवाजुद्दीनमध्ये संपत्तीबाबत सुरू झालेला वाद आता वाढत चालला आहे. आलिया नवाजुद्दीनवर अनेक गंभीर आरोप करत आहे.

त्याचवेळी अभिनेत्याच्या दुबईतील घरात राहणाऱ्या माेलकरणेही काही दिवसांपूर्वी नवाजुद्दीनवर आरोप केले होते. आलियाच्या वकिलाने ट्विटरवर माेलकरीणचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती रडताना म्हणते की, ‘नवाजुद्दीनने तिला दोन महिन्यांचा पगार दिला नाही अन् अन्यायकारकपणे कामावर घेतले गेले आहे, ज्यामुळे ती दुबईमध्ये राहत असून तिथे अडकली आहे.’ मात्र, हा व्हिडिओ रिलीज झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी माेलकरीणने नवाजवर लावलेले सर्व आरोप फेटाळून लावले.

मोलकरणीने तिचे म्हणणे मागे घेतल्यानंतर अभिनेत्याच्या भावाने ट्विटद्वारे अभिनेत्यावर टीका केली होती. तो म्हणाला होता की, “नवादुद्दीनने पैसे देऊन हाउसहेल्पला विकत घेतले आहे, पण असे किती दिवस करणार.” या सर्व प्रकारानंतर नवाजुद्दीन सिद्दीकी आज पहिल्यांदाच याबद्दल बोलला आहे.(bollywood actor nawazuddin siddiqui reaction on wife aaliya siddiqui and househelp sapna allegations)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
साऊथ इंडस्ट्रीमधील ‘हे’ दिग्गज अभिनेते किडनी स्टोनवरील उपचारासाठी रुग्णालयात दाखल

न सांगता फोटो काढल्यामुळे अभिनेत्री आलिया भट्ट भडकली, मुंबई पोलिसांना पोस्ट टॅग करत लिहिले…

हे देखील वाचा