Wednesday, July 3, 2024

दोन दशकं हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारा अभिनेता आर माधवन बनला ‘डॉक्टर’, वयाच्या ५० व्या वर्षी मिळाला सन्मान

आपल्या अभिनयाने मागील दोन दशकं हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारा अभिनेता आर माधवन वयाच्या ५० व्या वर्षी डॉक्टर बनला आहे. प्रसिद्ध रॉक वैज्ञानिक नंबी नारायणन यांच्या बायोपिक ‘रॉकेट्री’ च्या पोस्ट प्रॉडक्शनमध्ये सामील झालेल्या माधवनने आपल्या व्यस्त दिनचर्येमधून वेळ काढून ही मानद पदवी घेतली. ही पदवी माधवनला डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीने कोल्हापूरमध्ये बुधवारी (१७ फेब्रुवारी) दिली आहे.

अभिनेता आर माधवनने अभिनेत म्हणून हिंदी सिनेमात सन २००१ साली ‘रहना है तेरे दिल में’ या चित्रपटातून पाऊल ठेवले होते. या चित्रपटात त्याची अभिनेत्री दिया मिर्झा होती. नुकतेच दियाने उद्योजक वैभव रेखीसोबत लग्न केले आहे. माधवनचा मणिरत्नम दिग्दर्शित तमिळ चित्रपट ‘अलाइपुथे’ वर्षभरापूर्वी रिलीझ झाला. आपल्या सुरुवातीच्या चित्रपटापासूनच प्रेक्षकांवर छाप पाडणारा माधवन तेव्हापासूनच सातत्याने हिंदी, तमिळ, तेलुगु, मल्याळम, इंग्रजी यांसारखे चित्रपट करत आहे. कारकीर्दीच्या सुरुवातीलाच माधवनने कन्नड सिनेमातही काम केले आहे. तो एकमेव भारतीय अभिनेता आहे, ज्याची लोकप्रियता दोन दशकांपासून सर्व भारतीय भाषांतील चित्रपटांमध्ये बनली आहे.

या पॅन इंडिया सुपरस्टार माधवनचा दर्जा, सिनेमा आणि समाजातील योगदानाचा विचार करता, महाराष्ट्रातील उच्च शिक्षण संस्था डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीने त्याला डॉक्टरची पदवी दिली. यादरम्यान माधवन इंजिनीअरिंगच्या दिवसातील अनेक मित्र त्याला शुभेच्छा देण्यासाठी कोल्हापूरमध्ये पोहोचले. माधवनने स्नातकचे शिक्षण कोल्हापूरमधून केले आहे.

अभ्यासात होता अव्वल

त्याच्या अभ्यासाबद्दल बोलायचं झालं, तर ५० वर्षीय माधवनने इलेक्ट्रॉनिक्समध्ये बीएससी केले आहे. सन १९८८ मध्ये त्याला भारताचा सांस्कृतिक प्रतिनिधी बनून कॅनडाला जाण्याची संधी मिळाली होती. तिथे तो वर्षभर स्कॉलरशिपवर राहिला होता. तो ब्रिटीश आर्मी म्हणजेच रॉयल नेवी आणि रॉयल एअर फोर्ससोबत ट्रेनिंग घेणारा एनसीसी कॅडेटही राहिला आहे. माधवनला सैन्यात जायचे होते, परंतु त्याचे वय ६ महिने कमी होते. त्यामुळे त्याला सैन्यात भरती होता आले नव्हते.

आर माधवन अनलॉक झाल्यानंतर शूटिंग सुरू करणाऱ्या अभिनेत्यांमध्ये सर्वात पुढे राहिला आहे. त्याचा आगामी ‘मारा’ चित्रपट सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर धमाल करत आहे. हा एक असा सिनेमा असल्याचे म्हटले जात आहे, जो येणाऱ्या दिवसांमध्ये भारतीय सिनेमासाटी ट्रेंडसेंटर बनू शकते. विशेष म्हणजे, तमिळ भाषेत बनलेला हा सिनेमा ओटीटीवरील उत्तर भारतीय प्रेक्षकांनी मूळ भाषेतील प्रेक्षकांपेक्षा अधिक वेळा पाहिला आहे.

इंग्रजी सब टायटल्ससोबत रिलीझ झालेला हा चित्रपट इतरांच्या सुखासाठी आपल्या सुखाचा त्याग करणारी कहाणी आहे. वेगवेगळ्या वेळी नातेवाईकांपासून हरवलेली दोन मुले मोठी होऊन कशाप्रकारे भिंतींवर बनलेल्या पेंटिंग्जच्या मार्फत भेटतात, याचीही एक रंजक अशी कहाणी यामध्ये दाखवली आहे.

आर माधवनने नुकतेच नेटफ्लिक्सच्या एका मर्यादित एपिसोडच्या सीरिजची शूटिंग पूर्ण केली आहे. तसेच तो सध्या मुंबईत टी सीरिजच्या पुढील चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. शूटिंगदरम्यान वेळ काढून तो आपला ‘रॉकेट्री’ चित्रपटाचे पोस्ट प्रॉडक्शनही पूर्ण करण्याच्या कामात लागला आहे. असे म्हटले जात आहे की, या चित्रपटातील स्पेशल इफेक्ट्स त्याच टीमने तयार केले आहेत, ज्याने स्टीव्हन स्पीलबर्ग यांचा ‘अवतार’ चित्रपटाचे स्पेशल इफेक्ट्स तयार केले होते. या चित्रपटात माधवन चित्रपट दिग्दर्शकही बनला आहे.

आर माधवनने आतापर्यंत ‘३ इडियट्स’, ‘मारा’, ‘साला खडूस’, ‘तनू वेड्स मनू’, ‘रंग दे बसंती’, ‘गुरू’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

हे देखील वाचा