‘द कपिल शर्मा शो’च्या सेटवर कृष्णा आणि अर्चना करतायत ‘चोरीचा प्लॅन’, व्हिडिओ झाला ‘लीक’

Actress Archana Puran Singh And Krushna Abhisheks Private Conversation Leaked Planning To Steal Something


जॉनी लिव्हरपासून ते कपिल शर्मापर्यंत आपल्या जबरदस्त अभिनयाने चाहत्यांना पोट धरून हसवण्यास भाग पाडणारे अनेक कलाकार आपल्याला माहिती असतील. यापैकीच एक कलाकार म्हणजे अर्चना पूरण सिंग. अर्चनाने अनेक कॉमेडी शोमध्ये जज म्हणून भूमिका पार पाडल्या आहेत. ती सध्या ‘द कपिल शर्मा शो’मध्येही जज म्हणून दिसत आहे. अर्चना या शोचे बॅकस्टेज किंवा शूटिंग करतानाचे व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असते. नुकताच तिचा एक नवीन व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये ती कॉमेडियन कृष्णा अभिषेकसोबत खासगी चर्चा करताना दिसत आहे.

खरं तर, अर्चनाने ‘द कपिल शर्मा शो’मधील ‘सपना’ म्हणजेच अभिनेता कृष्णा अभिषेकसोबतचा आपला खासगी चर्चा करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ खूपच चर्चेत असून तिने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “खासगी चर्चा… थोडी गमतीशीर. खरं तर, तांत्रिक अडचणींमुळे शूटिंग थांबले होते, त्यावेळी मी आणि कृष्णाने स्वत:चे मनोरंजन केले.”

या व्हिडिओमध्ये अर्चना दिसणार नाही. केवळ तिचा आवाज ऐकू येईल, तर कृष्णा मात्र या संपूर्ण व्हिडिओत दिसत आहे. अर्चना कृष्णाला विचारते की, ‘तू धनीराम आहेस की राम लाल? नाव काय आहे?’ यादरम्यान इतर कोणीतरी आवाज देतो की, ‘रामलाल.’ यानंतर अर्चना म्हणते की, ‘हाय रामलाल कसा आहेस तू?’

या प्रश्नाचे उत्तर देताना कृष्णा म्हणतो की, ‘तुम्हाला माझ्यासमोर पाहून मला खूप चांगलं वाटत आहे.’ यानंतर कृष्णा हसत हसत म्हणतो की, ‘आम्ही तर केवळ चॉकलेट चोरतो, तुम्ही तर खूप मोठा हात मारला आहे.’ यानंतर अर्चना हटके अंदाजात म्हणते की, ‘कोणालाही सांगू नको रामलाल.’

यानंतर उत्तर देताना कृष्णा म्हणतो की, ‘कोणालाही समजणार नाही, संपूर्ण जग पाहत आहे.’ यानंतर पुन्हा एकदा अर्चना हसत हसत म्हणते की, ‘तू कोणालाही सांगू नको, मी तुला आणखी चॉकलेट आणून देईल.’ यानंतर कृष्णा म्हणतो की, ‘आपण दोघे मिळून आणखी चोरी करूया.’

या व्हिडिओच्या मागे कपिल शर्मा, बादशाहसोबत दिसत आहे. दुसरीकडे टेबलवर काही फळेही आहेत, त्यांना पाहून अर्चना म्हणते की, ‘ते जे फळे ठेवली आहेत ना, ते खूप महाग आहेत. त्यातील एक मी तुलाही देईल. बाकी घरी घेऊन जाईल. तू या सर्व गोष्टी माझ्याकडून शिकून घे.’ यावर कृष्णा म्हणतो की, ‘मलाही पुढे जायचं आहेे.’ यानंतर अर्चना म्हणते की, ‘खुर्चीवर बसायचं आहेे, परंतु या खुर्चीकडे पाहू नको, शिक्षकाचीही खुर्ची पाहू नको.’


Leave A Reply

Your email address will not be published.