आनंदाची बातमी! जया बच्चन ७ वर्षांनंतर झळकणार मोठ्या पडद्यावर, पहिल्यांदाच करणार मराठी चित्रपटात काम

Bollywood Actress Jaya Bachchan Returns To Acting After 7 Years For Marathi Film


बॉलिवूडमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारून कलाकारांनी चाहत्यांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. चाहत्यांना जर एखाद्या सिनेमाचं नाव सांगून त्यातील अभिनेेता किंवा अभिनेत्री जरी ओळखायला सांगितली, तरी ते अचूक सांगतात. या कलाकारांमध्ये बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची पत्नी आणि प्रसिद्ध अभिनेत्री जया बच्चन यांचाही समावेश आहे. त्यांनी आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली आहेत. मागील ७ वर्षांपासून चित्रपटापासून दूर असणाऱ्या जया बच्चन यांनी पुन्हा परतीचा विचार केला आहे.

परंतु यावेळी त्या हिंदी सिनेसृष्टीत नाही, तर मराठीत चित्रपटामध्ये काम करणार आहेत. कोणत्याही मराठी चित्रपटात काम करण्याची ही जया बच्चन यांची पहिलीच वेळ असेल.

जया बच्चन काम करणाऱ्या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन गजेंद्र अहिरे करणार आहेत. त्यांनी ‘शेवरी’, ‘अनुमती’ यांसारख्या ५० चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. अहिरे, जया बच्चन यांच्यासोबत २० दिवसातच चित्रपटाची शूटिंग संपवतील. जया बच्चन यांना दीर्घ काळानंतर मोठ्या पडद्यावर पाहणे, त्यांच्या चाहत्यांसाठी एका पार्टीपेक्षा कमी नसेल.

जया बच्चन यांनी १९७३ मध्ये अमिताभ बच्चन यांच्याशी लग्न केल्यानंतर चित्रपटसृष्टीपासून जवळपास दूर झाल्या होत्या. लग्नानंतर त्यांनी, ‘सिलसिला’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘लागा चुनरी में दाग’, ‘कल हो न हो’ यांसारख्या निवडक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांचा शेवटचा सिनेमा सन २०१२ साली आला होता. त्या चित्रपटाचे नाव ‘सनग्लास’ होते. या चित्रपटात त्यांच्यासोबत नसीरुद्दीन शाह होते. परंतु हा चित्रपट रिलीझ होऊ शकला नाही.

खरं तर जया बच्चन यांनी अभिनयाबरोबरच राजकारणाच्या माध्यमातूनही चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. सध्या त्या चित्रपटात दिसत नाहीत, परंतु त्या त्यांची नात नव्या नवेली नंदासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. मागील काही दिवसात जया बच्चन यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये त्या आपली मुलगी श्वेता बच्चन नंदासोबत डान्स करताना दिसत होत्या. तरीही हा व्हिडिओ खूप जुना होता, जो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांना श्वेता बच्चन आणि अभिषेक बच्चन असे दोन अपत्य आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘द कपिल शर्मा शो’च्या सेटवर कृष्णा आणि अर्चना करतायत ‘चोरीचा प्लॅन’, व्हिडिओ झाला ‘लीक’
-‘द रॉक’ होणार अमेरिकेचा राष्ट्रपती? अभिनेत्याने उत्सुकता केली जाहीर
-काय सांगता! रवीना टंडनचा नवरा होता फराह खानचा स्लीपिंग पार्टनर, ‘या’ कारणामुळे दोघे झोपायचे एकाच बेडवर


Leave A Reply

Your email address will not be published.