Monday, July 1, 2024

कोरोना काळात औषधांचा काळा बाजार करणाऱ्यांवर संतापला अभिनेता आर माधवन; म्हणाला…

संपूर्ण देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मृतांची संख्या देखील वाढत आहे. रुग्णांना वैद्यकीय सुविधांचा तुटवडा पडत आहे. सगळेजण या संकटातून भारताला बाहेर काढण्याचा विचार करत आहेत. जमेल तशी प्रत्येकजण मदत करत आहे. सोशल मीडिया माध्यमातून रुग्णांना मदत करत आहेत. एकीकडे रुग्णांची ही परिस्थिती आहे, तर दुसरीकडे अनेक लोक या संधीचा व्यापार करू पाहत आहेत. काही लोक ऑक्सिजन आणि इंजेक्शन जास्त किमतीने विकत आहेत. बॉलिवूड अभिनेता आर माधवनने अशा लोकांपासून सावध राहण्याचा इशारा सर्वांना दिला आहे. या अशा लोकांना त्याने सोशल मीडियावर चांगलेच सुनावले आहे.

त्याने ट्वीट करून लिहिले आहे की, “फ्रॉड अलर्ट, लोकांनी सावध व्हा. कारण आता लोक जागरूक झाले आहेत. मिस्टर अजय अग्रवाल 3000 रुपयाला रेमेडेसीविर हे इंजेक्शन विकत आहेत. ते तुमच्याकडून आयएमपीएस‌ द्वारे आधीच पैसे मागतील. जेणेकरून ते पॅन इंडियाद्वारे तीन तासात डिलीवरी करू शकता. नंतर ते तुमचा फोनच उचलणार नाहीत. अशांपासून लांब रहा. हा व्यक्ती फ्राॅड आहे. त्यामुळे सावध रहा. आपल्यामध्ये देखील असे काही राक्षस आहेत.”

नुकतेच काही दिवसांपूर्वी आर माधवनने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, माधवनची पत्नी काही गरीब मुलांना शिकवताना दिसत आहे. त्याची पत्नी सध्या घरीच असते. त्यामुळे ती व्हिडिओद्वारे मुलांना शिकवत आहे. हा व्हिडाओ शेअर करून त्याने लिहिले होते की, जेव्हा तुमची बायको तुम्हाला कमी असण्याची भावना देते.”

माधवनच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास,त्याच्या ‘रॉकेट्री : द नंबी इफेक्ट’ या आगामी चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. त्याचा हा आगामी चित्रपट एक बायोपीक आहे, जी वैज्ञानिकांवर आधारित असणार आहे. या चित्रपटात माधवन नंबी नारायनन यांचे पात्र निभावणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कोरोनाने घेतला महान व्यक्तीचा बळी! नेमबाज चंद्रो तोमर यांचे निधन, तापसी पन्नूने व्यक्त केला शोक

-‘मी परफेक्ट नाहीये’, लूकबद्दल प्रश्न उपस्थित केल्यानंतर अनुष्काने दिले होते प्रत्युत्तर

-‘जीवन पूर्वीसारखे होणे शक्य नाही’, म्हणत ऋषी कपूर यांच्या आठवणीत नीतू कपूर झाल्या भावुक

हे देखील वाचा