Sunday, May 11, 2025
Home बॉलीवूड रजनीकांत यांच्या धाकट्या मुलीची ‘ही’ खास गोष्ट गेली चोरीला, पोलिसात तक्रार दाखल

रजनीकांत यांच्या धाकट्या मुलीची ‘ही’ खास गोष्ट गेली चोरीला, पोलिसात तक्रार दाखल

साऊथचे सुपरस्टार रजनीकांत यांची धाकटी मुलगी सौंदर्या रजनीकांतबाबत एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. माध्यमातील वृत्तानुसार, अभिनेत्याची लेक साैंदर्या हिने चोरीप्रकरणी बुधवारी (दि. 10 मे)ला पोलिसात तक्रार दाखल केली आहे. काय म्हणटले साैंदर्याने तक्रारीत? चला जाणून घेऊया…

साैंदर्याने तक्रारीत म्हटले आहे की, ’23 एप्रिल रोजी ती रेंज रोव्हर कारमधून तिच्या घरातून तेनमपेट येथील महाविद्यालयात जात होती. मात्र, आलिशान वाहनाची बॅगेत ठेवलेली चावी गायब झाली आहे. या चाव्या शोधण्यासाठी तिने पाेलिसांना मदत मागितली आहे. अशात या प्रकरणी पोलिसांनी तक्रार नोंदवली असून तपास सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.’

याआधी रजनीकांत यांची मोठी मुलगी ऐश्वर्या रजनीकांत हिच्या घरातही चोरी झाली हाेती. तिने चेन्नईच्या तेनमपेट पोलिस स्टेशनमध्ये तिच्या मौल्यवान वस्तू हरवल्याची तक्रार देखील केली होती, ज्यावर शाेध घेतल्यानंतर ऐश्वर्याची मोलकरीण ईश्वरी आणि गुन्ह्यातील तिचा साथीदार व्यंकटेश यांच्याकडून दुप्पट रक्कम जप्त केली, जो त्याच्या घरी चालक म्हणून काम करत होता.

मंडळी, बऱ्याच वर्षानंतर ऐश्वर्या रजनीकांत पुन्हा अप्रतिम दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहे आणि ‘लाल सलाम’ चित्रपट घेऊन येत आहे. या चित्रपटात रजनीकांत यांची खास भूमिका असणार आहे.अशात अलीकडेच चित्रपटाचा फर्स्ट लूक समाेर आला असून त्याला सोशल मीडियावर संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.

रजनीकांतच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर त्यांनी साऊथसोबत अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे. मात्र, गेल्या बऱ्याच वर्षांपासून ते एकाही हिंदी चित्रपटात दिसलेले नाही. त्याच वेळी, नेल्सन दिलीप कुमार दिग्दर्शित आणि सन पिक्चर्स निर्मित ‘जेलर’ हा त्यांचा आगामी चित्रपट 10 ऑगस्ट रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे. अशात सध्या अभिनेता ऐश्वर्या रजनीकांतच्या ‘लाल सलाम’ या चित्रपटाचे शूटिंग करत आहे, ज्यामध्ये ते एका दमदार भूमिकेत दिसणार आहे. यात विष्णू विशाल आणि विक्रांत देखील मुख्य भूमिकेत आहेत.(bollywood actor rajinikanth daughter soundarya rajinikanth lodges police complaint for this reason)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या निर्मात्यांवर ‘या’ अभिनेत्रीने लावला घृणास्पद आरोप; म्हणाली, ’15 वर्षांपासून लैंगिक शोषण…’
सलग 3 वर्षे ऑडिशनमध्ये अभिनेत्याला नाकारले गेले, ‘या’ चित्रपटाने रातोरात बनवले स्टार

हे देखील वाचा