Saturday, March 2, 2024

रजनीकांत यांच्या सिनेमात काम केल्यानंतर ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीच्या करियरला लागली होती उतरती कळा

हिंदी सिनेसृष्टीतील सर्वात सुंदर काळ म्हणून ९० च्या दशकाला ओळखले जाते. या दशकात अनेक उत्तम सिनेमे तर झाले सोबतच उत्तम गायक, संगीतकार, गीतकार, अभिनेत्री, अभिनेते देखील आले. सगळे अगदी योग्य पद्धतीने या काळात जुळून आल्याने हा काळ तुफान गाजला. आजही या ९० च्या दशकाच्या चर्चा अनेकदा रंगताना दिसतात. याच काळात इथे एन्ट्री झाली ती अतिशय सुंदर अशा मनीषा कोईरालाची.

मनिषाने तिच्या करियरमध्ये त्या दशकातील सर्वच सुपरस्टार अभिनेत्यांसोबतच काम करत अनेक यशस्वी सिनेमे दिले. त्या काळातील सुपरस्टार अभिनेत्री म्हणून तिची गणती होती. तिने हिंदीसोबतच दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये देखील काम केले होते. यात तामिळ आणि तेलगू चित्रपटांचा समावेश आहे. तिथे तिने बॉम्बे, इंडियन आणि मुधालवन अशा काही चित्रपटांमध्ये काम करत लोकप्रियता मिळवली. नुकतीच तिने एक मुलाखत दिली ज्यात तिने सांगितले की एका चित्रपटांमुळे तिचे साऊथमधील करियर कसे संपले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manisha Koirala (@m_koirala)

या मुलाखतीमध्ये मनिषाने सांगितले की, २००२ साली ‘बाबा’ फ्लॉप झाल्यानंतर तिच्या करियरवर त्याचा मोठा परिणाम झाला. ती म्हणाली, “बाबा कदाचित शेवटचा माझा मोठा तामिळ सिनेमा होता. त्याकाळात हा सिनेमा मोठा फ्लॉप झाला. या चित्रपटापासून आम्हाला सगळ्यांना खूपच आशा होत्या. हा सिनेमा फ्लॉप झाला आणि मला साऊथमधून ऑफर येणे बंदच झाले.” या सिनेमात तिने रजनीकांत यांच्यासोबत काम केले होते. ‘बाबा’ला पुन्हा एकदा रजनीकांत यांच्या वाढदिवसाच्या दिवशी प्रदर्शित केले गेले होते. तेव्हा सिनेमाने चांगली कमाई केली होती. ती म्हणाली की, २० वर्षांनी सिनेमा होत झाल्याचा मला नक्कीच खूप आनंद झाला होता.

दरम्यान मनीषाच्या कामाबद्दल सांगायचे झाल्यास, ती लवकरच संजय लीला भन्साळी यांच्या ‘हिरामंडी’मध्ये दिसणार आहे. याशिवाय ती नुकतीच कार्तिक आर्यनच्या ‘शाहजादा’ सिनेमात त्याच्या आईच्या भूमिकेत झळकली होती.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सैफच्या आधी अमृता पडली हाेती ‘या’ क्रिकेटरच्या प्रेमात; प्रकरण लग्नापर्यंतही पाेहाेचले हाेते, पण…

‘त्या एका कॉलने माझं लाईफ…’ अभिनेत्री जुई गडकरीने शेअर केलेली “ती” पोस्ट चर्चेत

हे देखील वाचा